शिर्डी : बिबट्या समोर दिसला भल्या भल्यांच्या काळजाचा ठोका (Shirdi leopard playing with children) चुकतो. मात्र शिर्डीत राहाता तालुक्यातील रुई गावातील लहान मुलांची चक्क बिबट्याशी घट्ट मैत्री झाली आहे. त्यामुळे ही सर्व मुलं त्याच्याशी मनसोक्त खेळतात आणि बागडतात. या बच्चे कंपनीने त्याला ‘बगिरा’ असे नावही दिलं आहे.
बिबट्याचं हे बछडं अंदाजे तीन ते चार महिन्यांचं आहे. हे बछडं लहान मुलांसोबत अगदी मनसोक्त खेळतं. त्या बछड्याची कोणालाही भिती वाटत नाही. या बच्चे कंपनीने चक्क बिबट्याच्या बछड्याशीच मैत्री केली आहे. मोगली मालिकेतील ‘बगिरा’ या लोकप्रिय कार्टूनवरून त्याचं नावही ठेवण्यात आलं आहे. त्याला ‘बगिरा’ किंवा ‘बग्गी’ म्हणून हाक मारली की ते लगेच शेतातून मुलांकडे धावत येत आणि अल्लडपणे खेळते.
गेल्या अनेक दिवसांपासून बच्चे कंपनीप्रमाणे त्यालाही या लहानग्यांचा लळा लागला आहे. विशेष म्हणजे बिबट्याच हे पिल्लू परिसरात असून त्याच्या आईने मात्र कोणताही उच्छाद घातलेला नाही. बिबट्याची सर्वत्र दहशत असताना या परिसरातील जनावरांना तसेच रहिवासी नागरिकांना ते मात्र कोणताही त्रास देत (Shirdi leopard playing with children) नाही.
शिर्डी – शिंगवे रस्त्यावरील रूई येथील एका वस्तीवर हे बिबट्याच पिल्लू दररोज बच्चे कंपनीसोबत खेळायला येतं. सुरुवातील दिया या लहान मुलीची या बिबट्याच्या पिल्लाशी मैत्री झाली. त्यानंतर आसपासची मुलंही बघिराचे मित्र बनले. सुरुवातीला बिबट्याच्या आईच्या भितीने पिल्लाजवळ कोणी जात नव्हते. मात्र हे बछडे रोज वस्तीवर खेळत असल्याने मुलेही त्याच्या बरोबर खेळू लागली. आता तर रोज शाळेत जाण्याअगोदर आणि शाळा सुटल्यानंतर ही सर्व मुलं त्या बिबट्याशी खेळतात.
सध्या ऊस तोडणी हंगाम सुरु आहे. ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी बिबट्याची पिल्ले आढळून येतात. तसेच नगर जिल्हयात बिबट्यांची मोठी दहशत आहे. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक जनावरे तसेच लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून वनविभागाला सूचना देण्यात आली आहे. पण हे बछडे परिसरातून नेले तर, बिबट्याची आई त्याच्या विरहाने जनावरे आणि माणसांवर हल्ला करेल. अशी भीती अनेकांना आहे. त्यामुळे बिबटयाचं हे बछड त्यांनी परिसरात खेळू द्यावे अशी भूमिका वनविभागाने घेतली (Shirdi leopard playing with children) आहे.
पाहा व्हिडीओ :
VIDEO : खोडकर, खट्याळ ‘बगिरा’ प्रत्यक्षात, शिर्डीत लहान मुलांची बिबट्याशी घट्ट मैत्री pic.twitter.com/XiyYH6noX2
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2020