शिर्डीचे साई मंदिर उघडण्याची प्रशासनाची तयारी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना, सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा

| Updated on: Jul 05, 2020 | 4:45 PM

शिर्डीतील साईमंदिर संस्थानाने साई मंदिर उघडण्यास तयारी केली (Shirdi Sai Temple Effective Measures For Covid Pandemic) आहे.

शिर्डीचे साई मंदिर उघडण्याची प्रशासनाची तयारी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना, सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा
Follow us on

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली (Shirdi Sai Temple Effective Measures For Covid Pandemic) आहेत. ही मंदिर उघडावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. शिर्डीतील साईमंदिर संस्थानाने साई मंदिर उघडण्यास तयारी केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी साई संस्थानकडून प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, असे प्रशासनाचे म्हणणं आहे. मात्र सद्यस्थितीत त्यांना सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थानाने कोरोना काळात मंदिरात अनेक प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार दर एका तासाला 300 भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दिवसभरात केवळ 3 ते 3500 भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

साईमंदिर सुरु करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. सरकारच्या आदेशानंतर साई मंदिर सुरु करण्यात येईल अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

गुरुपोर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा 

दरम्यान कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपोर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव पार पडला. गेल्या 4 जुलैपासून 6 जुलैपर्यंत असा तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात आला. यात केवळ साध्या पद्धतीने धार्मिक विधी पार पडल्या. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे. दरवर्षी साईबाबांना गुरु स्वरुप मानत लाखो भाविक साई दरबारी साईदर्शनाला हजेरी लावतात. मात्र यंदा घरी राहूनच आपल्या गुरुला वंदन करावे, असे साई संस्थानचे म्हणणं (Shirdi Sai Temple Effective Measures For Covid Pandemic) आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना लढ्यात शिर्डी साई संस्थानाचा सहभाग, रुग्णांसाठी भक्त निवासात कोविड रुग्णालयाची निर्मिती

corona | शिर्डीच्या दानपेटीतून 51 कोटी, क्रिकेटचा देवही धावला, कोणाकडून किती मदत?