शिर्डी : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरं भक्तांसाठी बंद करण्यात आली आहेत. शिर्डीचे साई मंदिर मंगळवार दुपारी तीन वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. साईबाबा मंदिर बंद राहण्याची संस्थानाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. (Shirdi Sai Temple Closed)
यापूर्वी 1941 मध्ये ब्रिटिशांनी ‘रामनवमी’ उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवलं होतं. कॉलरा आजाराची साथ पसरल्यामुळे त्यावेळी मंदिर पाच दिवस भक्तांसाठी बंद करण्यात आलं होतं. 79 वर्षांपूर्वीच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली आहे.
साई मंदिर बंद राहिल्यामुळे कधी नव्हे तो शिर्डी शहर आणि मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवली आहेत. कोरोनाची कु-हाड शिर्डीच्या अर्थकारणावर कोसळल्याचं चित्र आहे
देऊळ बंद ठेवण्याच्या निर्णयाचं ग्रामस्थांनीही स्वागत केलं आहे. रस्त्यावरही शांतता आहे. साई मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरु असणार आहेत.
‘समीप आलेली लग्नघटिका’ पुढे ढकलली, 5 हजार वऱ्हाडी थोपवले, ‘कोरोना’मुळे विवाह सोहळे रद्द
याशिवाय पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर अशी सर्वच मोठी देवळं बंद झाली आहेत.
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे, तर राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. राज्यातील ‘कोरोना’चे सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद? https://t.co/WbXGJ99PxU
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2020
राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?
Shirdi Sai Temple Closed