साईबाबांच्या तिजोरीत मागील वर्षीच्या तुलनेत 2 कोटींची वाढ, एकूण जमा रक्कम तब्बल…

| Updated on: Jan 01, 2020 | 11:08 PM

साईबाबांच्या चरणी सरत्या वर्षभरात सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक (Shirdi sai temple income) भाविकांनी तब्बल 290 कोटींच्या रकमेचे दान साईच्या तिजोरीत केले.

साईबाबांच्या तिजोरीत मागील वर्षीच्या तुलनेत 2 कोटींची वाढ, एकूण जमा रक्कम तब्बल...
Follow us on

शिर्डी : साईबाबांच्या चरणी सरत्या वर्षभरात सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक (Shirdi sai temple income) भाविकांनी तब्बल 290 कोटींच्या रकमेचे दान साईच्या तिजोरीत केले. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये साईबाबांच्या तिजोरीतील दानाची रक्कम दोन कोटींहून (Shirdi sai temple income) अधिक वाढली आहे.

वर्ष 2019 मध्ये साईंच्या तिजोरीत 156 कोटी 49 लाख 2 हजार 350 रुपयांचे गुप्तदान झाले आहे. देणगी काउंटवर 60 कोटी 84 लाख 8 हजार 590 रुपयांचे दान करण्यात आले. धनादेश स्वरूपात 23 कोटी 35 लाख 90 हजार 409 रुपये दान आले आहे. मनीऑर्डरच्या स्वरूपात 2 कोटी 17 लाख 83 हजार 515 रुपये, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 17 कोटी 59 लाख 11 हजार 424 रुपये आणि ऑनलाईन देणगीद्वारे 16 कोटी 2 लाख 51 हजार 606 रुपये दान जमा झाले आहे. या व्यतिरिक्त संस्थानला यंदाच्या वर्षी 19 किलो ग्रॅम सोने आणि 757.470 ग्रॅम चांदी दान स्वरूपात मिळाल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

साईबाबा मंदिरात काल (31 डिसेंबर) दिल्ली येथील भक्त रक्षा शर्मा यांनी तब्बल 30 तोळे सोन्याने मढवलेला साडेबारा लाख रुपये किंमतीचा शंख साईचरणी अपर्ण केला. विशेष म्हणजे मंदिराचा कळस, गाभारा सोन्याचा आहे. याशिवाय आरती, अभिषेक, मंगलस्नान इतर सर्व साहित्य हे सोन्याचे आहे.

साईबाबा संस्थानच्या तिजोरीत आजच्या तारखेला 2300 कोटी रोख रक्कम जमा आहे. जी वेगवेळ्या बँकेत डीपॉझीट आहे, तर 454 किलो सोने आणि 5 हजार 553 किलो चांदी जमा आहे.

वर्षानिहाय तिजोरीत जमा झालेली रक्कम

2014 -15

उत्पन्न – 431 करोड
खर्च – 214 करोड 5 लाख
बँक डीपॉजीट – 1374 करोड 78 लाख

2015-16

उत्पन्न – 427 करोड 20 लाख
खर्च – 255 करोड 82 लाख
बँक डीपॉजीट – 1585 करोड

2016-17

उत्पन्न – 480 करोड 98
खर्च – 294 करोड 18 लाख
बँक डीपॉजीट – 1880 करोड 10 लाख

2017- 18

उत्पन्न – 606 करोड 63 लाख
खर्च – 319 करोड 92 लाख
बँक डीपॉजीट – 2136 करोड 49 लाख

2018 – 19

उत्पन्न – 689 करोड 43 लाख
खर्च – 608 करोड 40 लाख
बँक डीपॉजीट – 2237 करोड 70 लाख

साईबाबा संस्थानच्या माध्यामातून होणारे मोठे खर्च

शैक्षणिक : आयटीआय कॉलेज, इंग्रजी स्कूल, ज्युनिअर आणि सीनियर कॉलेजमध्ये माफक दरात शिक्षण

मोफत रुग्णालय : साईबाबा रुग्णालयात मोफत उपचार तर साईनाथ रुग्णालयात अल्प दरात उपचार, उपचारासाठी दरवर्षी 60 ते 70 कोटी रुपयांची बिल माफी, बाह्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक रुग्णास 25 हजारांची मदत.

दर्शनासाठी येणा-या भाविकांना मोफत बुंदी प्रसाद,

दरवर्षी 25 ते 30 कोटींचा खर्च, प्रसादालयात वर्षभर मोफत भोजन,

राज्य सरकारच्या प्रकल्पांना निधी, दुष्काळासाठी निधी, सामजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत

अल्प दरात भक्तांसाठी राहण्यासाठी रुमची व्यवस्था