शिर्डी : अनलॉक-5 ची नवीन नियमावली जाहीर झाली आणि अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली (Shirdi Temple Pilgrim Came For Darshan). मात्र, राज्यातील मंदिर, मशीद आणि इतर प्रार्थनास्थळं अद्यापही बंद असल्याने भक्तांमधून नाराजी व्यक्त होते आहे. देऊळ जरी बंद असले तरी शिर्डीत साईदर्शनासाठी भाविक गर्दी करत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. ई-पासची अट रद्द झाल्यानंतर आता शिर्डीत परराज्यातील भाविकांची मांदियाळी देखील वाढत आहे. कळसाचे दर्शन, तसेच आरतीचा लाभ देखील भाविक घेताना दिसत आहेत (Shirdi Temple Pilgrim Came For Darshan).
गेल्या 17 मार्चपासून शिर्डीचे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून शिर्डीचं अर्थकारण ठप्प झालं आहे. रोज कोट्यावधी रुपयांचं आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांसह साईसंस्थानला देखील होत आहे. अनलॉक-5 मध्ये मंदिरं उघडतील अशी अपेक्षा भक्तांना होती. मात्र, पुन्हा एकदा मंदिराचे टाळे अद्यापही कायम असून ते उघडण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
देशातील ई-पासची अट आता रद्द झाल्यानंतर साईभक्तांनी शिर्डीत येण्यास सुरुवात केली असून राज्यातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील भाविक सुद्धा कळसाच दर्शन घेण्यासाठी गर्दी करु लागले आहेत (Shirdi Temple Pilgrim Came For Darshan).
साई मंदिर परिसरात आता साईभक्त स्तवन मंजिरीचं वाचन करत आहेत, तर साईंच्या सर्वच आरत्यांच्या वेळी कळसा समोर उभे राहून आरतीत ही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एकीकडे, सरकार बार उघडण्याची परवानगी देते, तर दुसरीकडे आस्थेच्या स्थानावर बंदी कायम असल्याने शिर्डीकर तसेच व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यास आवश्यक त्या उपायोजनेसह साई मंदिर सज्ज आहे. नुकतेच साईबाबा संस्थानच्या शिष्टमंडळाने तिरुपती देवस्थानचा दौरा केला आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तशा सुविधा देखील निर्माण केल्या आहेत. त्यामुळे साई मंदिर खूले करण्यास राज्य सरकारने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी केली.
ही मंदिरं उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मंदिरं सुरू करण्याची मागणी केली होती.
Unlock 5 Guidelines | केंद्राची सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी मात्र महाराष्ट्र सरकारचा वेगळा निर्णयhttps://t.co/xs7crQPBES #unlock5 #corona #modigovt #maharashtragovt #lockdown #narendramodi #uddhavthackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2020
Shirdi Temple Pilgrim Came For Darshan
संबंधित बातम्या :
Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंद