कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने (Shiv Sena MP Dhairyasheel Mane) यांचा आणखी एक दिलदारपणा समोर आला आहे. कोरोनामुळे जनता संकटात असताना, खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर दिले आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बंगला, त्यांनी रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी दिला आहे. (Shiv Sena MP Dhairyasheel Manes house for quarantine)
कराड येथून रुकडी या गावात परतलेल्या विद्यार्थ्याला होम क्वारंटाईन करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर राहण्यासाठी दिलं. या विद्यार्थ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, मात्र त्याला 14 दिवस होम क्वारंटाईन राहणं आवश्यक आहे. ‘कोल्हापुरी पॅटर्न’ची सुरुवात स्वत:पासून आज केली, असं खासदार धैर्यशील माने म्हणाले. क्वारंटाईनसाठी स्वत:चं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील पहिले खासदार आहेत.
वाचा : कोल्हापूर पॅटर्न! धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी, आई म्हणाली….!
धैर्यशील माने यांचा हा काही पहिलाच दिलदारपणा नाही. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी पराभूत केलेले तत्कालिन खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राजू शेट्टी यांच्या आईच्या पाया पडून त्यांचेही आशिर्वाद घेतले होते.
याशिवाय गेल्या वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराने वेढलं होतं. त्यावेळी धैर्यशील माने हे स्वत: महापुरात उतरुन मदत करत होते. धैर्यशील माने यांनी स्वतः मदतीच्या साहित्याची पोती खांद्यावरुन ट्रकमधून उतरवली होती.
(Shiv Sena MP Dhairyasheel Manes house for quarantine)
संबंधित बातम्या
पूरग्रस्तांचं ओझं खांद्यावर, खासदार धैर्यशील मानेंनी ट्रकमधील पोती स्वतः उतरवली
जोरदार पावसाला धारदार भाषणाने उत्तर, उभ्या पावसात धैर्यशील मानेंची खणखणीत सभा
कोल्हापुरात खासदार धैर्यशील मानेंसमोर आंदोलक महिलांच्या पंचगंगा नदीत उड्या
‘त्यांच्या’ केसाला धक्का लागला, तरी शिवसेनेशी गाठ, खासदार धैर्यशील मानेंचा इशारा