मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला (Shivsena Bjp Criticizes On ShivBhojan Thali) आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘शिवभोजन थाळी’ योजनेचा विस्तार करण्यात आला. पुढच्या तीन महिन्यांसाठी ‘शिवभोजन थाळी’ 10 रुपयांऐवजी 5 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता शिवभोजन थाळीवरुन शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीचा पत्ता द्यावा, अशी खोचक (Shivsena Bjp Criticizes On ShivBhojan Thali) टीका मुंबई महापालिकेतील भांडुपच्या भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी केली आहे. पाच रुपयात शिवभोजन थाळी कुठे मिळते असा प्रश्नही जागृती पाटील यांनी उपस्थित केला आहे.
“महापालिकेचे अर्धे कच्चे अपुरे जेवण / खिचडी भांडुपला दुपारी 3.30 ला येते. नगरसेविका जागृती पाटील भांडुप वार्ड 116 मध्ये स्वत:च्या पदरचे पाच हजार रूपये भरून दररोज 1000 थाळया गरजूंना वाटू इच्छितात. कृपया शिवभोजन थाळीचा पत्ता द्यावा ही नम्र विनंती,” अशी खोचक प्रतिक्रिया जागृती पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे.
पुण्यात ‘शरद भोजन’ सुरु, ‘कोरोना विषाणू’ संसर्ग काळात योजना
जागृती पाटील यांच्या प्रतिक्रियेला शिवसेना प्रवक्त्या शुभा राऊळ यांनीही प्रत्युत्तर दिलं. “शिवभोजन थाळीही सर्व राज्यातल्या जाती-धर्म पक्षाच्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. शिवभोजन थाळी ही सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे. कोणाला ही योजना चांगली चालली आहे पाहून राजकीय पोट दुखी होत असेल तरी वेगळी गोष्ट आहे,” असा टोला शुभा राऊळ यांनी लगावला.
“जर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला तर कोणीच उपेक्षित राहत असेल ही माहिती मिळेल. सर्व गरजूंचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालय करत आहे. त्यामुळे सामान्य गरजूंची तक्रार नाही आहे. राजकीय तक्रार असेल तर तो मानसिक विषय आहे या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही,” अशीही प्रतिक्रिया शुभा राऊळ यांनी (Shivsena Bjp Criticizes On ShivBhojan Thali) दिली.