मुंबई : शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतंच ट्विटरवरुन या दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली (priyanka chaturvedi threat msg) आहे. दरम्यान शीतल म्हात्रे यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल (priyanka chaturvedi threat msg) केली आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना रात्री 9 च्या सुमारास ट्विटरवरुन धमकी देण्यात आली. आशिष केआर डेवेडी असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाऊंटवरुन शीतल म्हात्रे आणि प्रियांक चतुर्वेदी यांना धमकी देण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास त्या ट्विटर अकाऊंट तपासत असताना त्यांना ट्विटरवरुन धमकीवजा मॅसेज दिसला. त्यात शिवसेना प्रवक्त्या आणि नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही ट्विटरच्या माध्यामातून हा धमकीवजा मॅसेज देण्यात आला होता. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.
शीतल म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आशिष नावाच्या व्यक्तीने त्याच्या @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाउंटवरुन यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनंतर आरोपीवर कलम 506 अतंर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे गेल्या 15 वर्षांपासून बोरिवली लिंकरोड वरील कांदरपाडा परिसरात राहतात. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्याशिवाय त्या मुंबई महानगरपालिकेच्या विधी आणि महसूल मंडळाच्या अध्यक्षाही आहेत.
कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?