मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : नाशिक, पुणे, मुंबई ज्याप्रमाणे ड्रग्सचा फैलाव झालाय, ते सगळं गुजरातमार्गे या शहरांत पोचत आहे. गुजरातचा उडता गुजरात झाला आहे, त्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्राचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का असा सवाल विचारत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.
मुंबईसह अनेक राज्यातील अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला नेले. त्याचबरोबर जगातला ड्रग्जचा व्यवहार आणि व्यापरही त्यांनी गुजरातला नेला, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. गेल्या काही काळापासून कोट्यवधींचे अमली पदार्थ हे फक्त गुजरातच्या बंदरावर उतरवले जातात. आणि संपूर्ण देशातील तरूण पिढी ही नासवण्याचा प्रकार गुजरातच्या भूमीतून होत आहे. तेव्हा नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन ज्ञान देण्यापेक्षा , प्रवचन देण्यापेक्षा गुजरातमध्येच हजारो कोटींचं ड्रग्ज का उतरतंय याबद्दल महाराष्ट्राला, देशाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.
पंतप्रधान खोटं बोलतात
पंतप्रधान खोटं बोलत आहे. खरंतर देशाच्या पंतप्रधानांनी खोट बोलू नये, त्यांनी आपली आधीची विधान आठवावीत. शरद पवार या देशाचे उत्तम कृषीमंत्री होते, असं ते यापूर्वी म्हणाले होते. यूपीए सरकारमध्ये नरेंद्र मोदींबाबत वेगळी भूमिका घेतली गेली होती, तेव्हा कृषीमंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी-सहकाराबाबत आवर्जून मदत करत होते. हे नरेंद्र मोदींनी वारंवार जाहीरपणे सांगितलं आहे. एखाद्या गावात निवडणुकीबाबत त्यांना खोटं बोलायचं असेल, तर ते बोलू शकतात. मोदींनी हेही सांगितलं होतं की शरद पवारांचा हात धरून मी राजकारणात आलो. शरद पवार माझे राजकीय गुरू असंही मोदी म्हणाले होते.
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, “The new parliament is like a five-star jail where you can’t work. When we form our govt we will start our parliament session in our historical parliament (old parliament). PM Modi should set a target of 600 instead of 400… pic.twitter.com/l2FouO9qGc
— ANI (@ANI) February 29, 2024
सर्वात मोठ्या आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला पक्षात घेतलं
महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श घोटाळा असं मोदी म्हणाले होते. त्याच घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी पक्षात घेतलं, राज्यसभेची उमेदावारीही दिली. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं मोदी म्हणाले होते मात्र त्यांनी अजित पवारांना आपल्याच पक्षात घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे मोदींच्या विधानांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता महाराष्ट्रात व देशात नाही. ते खोटं बोलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.