Sanjay Raut | आज मोदींच्या नावाचा जप करा, उद्या पंतप्रधानपद जाताच… संजय राऊत यांचं मोठं विधान काय?

| Updated on: Feb 08, 2024 | 10:25 AM

पंडित नेहरूंच्या विरोधात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे. त्यांच्या मृत्यूला ६० वर्ष झाली, पण गेल्या १० वर्षांपासून मोदी त्यांच्या नावाचा जप करत आहेत. मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचं स्मरण कोणालाही राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Sanjay Raut | आज मोदींच्या नावाचा जप करा, उद्या पंतप्रधानपद जाताच... संजय राऊत यांचं मोठं विधान काय?
Follow us on

नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : पंडित नेहरूंच नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, पाणी गोड लागत नाही. पण नेहरूंच्या विरोधात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे. त्यांच्या मृत्यूला 60 वर्षं झाली, पण गेल्या 10 वर्षांपासून मोदी त्यांच्या नावाचा जप करत आहेत.  पण मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचं स्मरण कोणालाही राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. त्या बद्दल बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.

भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला. त्यांनी नेहरु यांचा उल्लेख आरक्षणासंदर्भात केला. एकदा नेहरुंनी त्यावेळी देशातील मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहीली होती, तीच पंतप्रधानांनी वाचून दाखवली.  एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी यांनी पंडीत नेहरुंवर टीकाही केली. 1959 रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचा उल्लेख करीत देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु यांनी देशाच्या जनतेला आळशी आणि कमी अकलेचे समजायचे अशी टीका मोदी यांनी केली. मोदी यांनी नेहरुंचे भाषण वाचून दाखवत म्हटले, की नेहरु म्हणतात भारतातील लोकांना मेहनत करण्याची सवय नाही. याचाच संदर्भ देत संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.

भाजपला आजही काँग्रेसची भीती

शिवसेनेचे, भाजपचे नेते सारखे काँग्रेसवर टीका करतात, नेहरूंविषयी बोलतात.  त्यांना काँग्रेसची भीती  वाटते. आजही त्यांना, भाजपला काँग्रेसचं , मविआचं आव्हान आहे, भीती आहे, हे स्पष्ट दिसतंय. तुम्ही स्वत:च्या बळावर 400 जागा मिळवणार आहात ना ? अबकी बार 400पार असा नाराही देताय, मग गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही सातत्याने काँग्रेसवर टीका का करताय, ५०-६० वर्षांपूर्वीचा इतिहास तोडून-मोडून का सांगताय ?, असा सवाल राऊत यांनी विचारला.

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख का नाही, काश्मिरी पंडितांविषयी काहीच बोलले नाहीत, लडाखमध्ये जे चीन घुसलंय, त्यावर भूमिका स्पष्ट केली नाही. फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत आहेत इतकी वर्ष, त्यावरूनच त्यांना काँग्रेसची भीती वाटते हे स्पष्ट होतं, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर फडणवीसांनी चर्चा करावी

देवेंद्र फडणवीस सध्या विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत. ती चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे, रोज त्यांच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत. रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतोय. आजही टाकलाय.

हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, यातला एक ठाण्या-पुण्यातला महत्वाचा आरोपी जामीनावर सुटलेला आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. आत्तापर्यंत 350 गुंडांना अशा प्रकारे प्रवेश दिला आहे. आणि तेवढेच गुंड वेटिंगला आहेत पदासांठी, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात गुंडांच राज्य सुरू आहे, ते गुंडांचं राज्य , राज्यसभेवर कोणाला, एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का, असाही सवाल आहे. फडणवीसांनी त्यावर भाष्य केलं पाहिजे.