उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 11 जणांवर कलम 307 प्रमाणे हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात (omraje nimbalkar attempt murder) आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिंमत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य 8 अनोळखी आरोपींचा समावेश आहे. यानंतर खासदार ओमराजे त्यांचे नातेवाईक हिंमत पाटील यांच्यासह 4 आरोपी पसार झाले (omraje nimbalkar attempt murder) आहेत.
काल (30 डिसेंबर) तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. आज खासदार ओमराजेवर गुन्हा नोंद झाला आहे. यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात पाटील व राजेनिंबाळकर सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे .
कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश दंडनाईक हे भाजप आमदार राणा पाटील यांचे समर्थक (omraje nimbalkar attempt murder) आहेत.
दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 29 डिसेंबर रोजी ते स्वतः, गणेश भातलवंडे व गाडी चालक पोपट चव्हाण हे मिळून रात्री 8.30 वाजता अकलूज येथे गेलो. कळंब पंचायत समिती सदस्य हिंमतराव पाटील यांच्या घरी असल्याची खात्री करण्यासाठी गेलो होते. त्यावेळी 3 पंचायत समिती सदस्य देण्याची विनंती केली. हे सदस्य स्वखुशीने आले की बळजबरीने याची खात्री करायची असे सांगितल्यावर हिंमतराव पाटील यांनी माझ्यावर हल्ला केला.
त्यानंतर जीव वाचविण्यासाठी मी पळालो असता माझा 1 किमी पाठलाग करून मला पकडले. त्यानंतर घरात आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हिंमतराव पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन लावला आणि सांगितले की मी यांना पकडले आहे.
त्यावर ओमराजे फोनवर म्हणाले की त्यांना सोडू नका त्यांना धडा शिकवा असे मी फोन स्पीकरवर असताना ऐकले. त्यानंतर पाटील यांनी सत्ततूर डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला व भातलवंडे आणि चव्हाण यांनाही पकडून मारहाण केली. हिंमतराव पाटील यांनी त्यानंतर आम्हाला अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी माझ्या पायाला व हाताला मुक्कामार लागला आहे. मी घाबरल्याने फिर्याद दिली नव्हती मात्र माजी मानसिक स्थिती ठीक झाल्याने व भीती कमी झाल्याने अटकेत असताना तक्रार देत (omraje nimbalkar attempt murder) आहे .
कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून सत्तासंघर्ष सुरू असून आज होणाऱ्या निवडीकडे लक्ष लागले आहे.
राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करीत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आमदार राणा यांनी त्यांच्या समर्थकांसह माळेवाडीतील बोरगाव गावात जाऊन हिंमतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घालत मारहाण केली. यानंतर 4 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आमदार राणा यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सध्या राणा पसार आहेत.
कळंब पंचायत समितीचे सदस्य घरात ठेवल्याच्या आरोपातून राणाजगजितसिंह यांनी हिंमतराव पाटील यांच्या घरी जात गोंधळ केला. त्यानतंर त्यांना मारहाण केली. यामुळे त्या ठिकाणी अनेक गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी राणा समर्थक यांना पकडायला सुरुवात करताच आमदार राणा हे त्यांची गाडी MH 12 PP 5511 घेऊन निघून गेले. असे तक्रारीत नमूद करण्यात आले (MLA Rana jagjitsinh patil attempt murder) आहे.