सिंधुदुर्ग : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र पुढील सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. (Shivsena MP Vinayak Raut Corona Free)
विनायक राऊत यांना 11 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा अश्याच पाठीशी राहू दे, आणि लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. pic.twitter.com/bm8cbjifXW
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) September 11, 2020
कोरोनावर मात करुन रुग्णालयाच्या बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी राऊत यांनी कोकणातील जनतेचे आभार मानले. तसेच नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांनी धन्यवाद दिले.
दरम्यान विनायक राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आमदार वैभव नाईक यांनी दिलं होतं. आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायक राऊत साहेब यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला, अशी पोस्ट वैभव नाईक यांनी केली होती.(Shivsena MP Vinayak Raut Corona Free)
संबंधित बातम्या :
राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही, तर राम भक्तांचे, विनायक राऊतांचा टोला