पुणे – आंबेगाव (Ambegaon)तालुक्यातील चिखली इष्टेवाडी येथील 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकुश सखाराम भोमाळे असे 27 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाने दोरीच्या साहाय्याने हिरडीच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. याबाबत मयत तरुणाचे मामा सखाराम लक्ष्मण भुरकुंडे यांनी घोडेगाव पोलीस (Ghodegaon Police) ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. अंकुशने उचलेल्या धक्कादायक पावलांमुळे स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण चिखली इष्टेवाडी येथील रहिवाशी आहे . घटनेच्या वेळी तो परिसरातील धुडीचे लवण नावाच्या शेताकडे गेला . त्याने तिथे हिरडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेनंतर फिर्यादी मृत अंकुशचे मामा या परिसरात गेले असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी त्याला खाली उतरवत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अंकुशने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्यापही समोर आलेले नाही. याप्रकरणी घोडेगाव पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस इष्टे पुढील तपास करत आहे.
महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!
गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ