मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 28 दिवसांनंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा (Showik Chakraborty) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. शौविक ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा (Drugs Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे (Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC).
Maharashtra: Bombay High Court grants bail to Rhea Chakraborty (in file pic), rejects bail plea of her brother Showik Chakraborty.
Narcotics Control Bureau had arrested them in connection with a drugs case related to #SushantSinghRajput death pic.twitter.com/FqhCS7UzGy
— ANI (@ANI) October 7, 2020
शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) हा अमलीपदार्थांचा बेकायदा पुरवठा करणाऱ्या टोळीचा आणि साखळीचा एक भाग आहे, हे दाखवणारे पुरेसे पुरावे या टप्प्यावर एनसीबीने सादर केले आहेत. हे पुरावे पाहता शौविकचा अनेक अमलीपदार्थ विक्रेत्यांशी (Drugs Syndicate) परिचय होता. तसेच तो सतत त्यांच्या संपर्कात होता. त्यांच्यासोबत व्यवहारही करत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्याला सध्या जामीन मंजूर करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर, शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) विशेष एनडीपीएस कोर्टात जामिनासाठी अर्ज करू शकतो, असेही हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आबीद बसित परिहार याच्याबाबतही एनसीबीचा युक्तिवाद मान्य करून, त्याचा ही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीसह सुमारे 21 जणांना अटक झाली होती. ज्यांना तपासाच्या सुरुवातीला अटक झाली होती आणि जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यापैकी पाच जणांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी 23 सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता, ज्यावर आज निर्णय देण्यात आला आहे. (Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)
शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत आणि आबीद बसित परिहार या चार जणांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, यापैकी केवळ रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत या तिघांनाच जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटीदेखील घातल्या आहेत. तर, शौविक चक्रवर्ती आणि आबीद बसित परिहार यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला गेला आहे.
Mumbai: Actor Rhea Chakraborty released from Byculla jail after a month.
She was granted bail by Bombay High Court in a drug-related case filed against her by Narcotics Control Bureau (NCB) pic.twitter.com/FlfP1re1cQ
— ANI (@ANI) October 7, 2020
रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला आहे. दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले.
(Showik Chakraborty is involve in the Drugs Syndicate says Mumbai HC)
संबंधित बातम्या :
Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!
Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!