सातारा: जिल्हयातील लोणंद येथील ‘श्री भैरवनाथ डोंगर’ या ग्रुपने शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना आदरांजली देण्यासाठी थेट महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर जाण्याचा निर्णय घेतला. ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली. ( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)
सातारा येथील लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीच्या कळसुबाई शिखर मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे साठ सदस्य कळसुबाई शिखरावर दाखल झाले. ग्रुपच्या सदस्यांनी 321 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाद्वारे महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी मानवंदना दिली. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अनोख्या मार्गांने आदरांजली वाहिल्याबद्दल भैरवनाथ ग्रुपचं कौतुक करण्यात येत आहे.
श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांमध्ये 5 वर्षाच्या मुलांपासून 65 वर्षापर्यंतच्या वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. ग्रुपच्या सर्व साठ सदस्यांनी कळसुबाई शिखर यशस्वी सर केले. तिरंग्यातून महाराष्ट्रचा नकाशा सर्वोच शिखरावर साकारण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कळसुबाई शिखरावर जाऊन तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राचा नकाशा करण्याची संकल्पना एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांनी मांडली होती. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)
भैरवनाथ डोंगर ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर हा उपक्रम राबवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली होती. कळसुबाई शिखरावर 321 फुटांच्या तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राच्या नकाशाची प्रतिकृती बनवल्याचा अभिमान, असल्याचे शशिकांत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. कोल्हापूरच्या निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील 21 नोव्हेंबरला, आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील ऋषीकेश जोंधळे हे 13 नोव्हेंबरला शहीद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील काटोल गावातील भूषण सतई हे देखील पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते.
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 25 November 2020 https://t.co/YerXWV3J9U @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
संबंधित बातम्या :
Sangram Patil Martyr | शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
आठवडाभरात कोल्हापूरचे दोन जवान शहीद, दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी, सतेज पाटलांची घोषणा
शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)