जालन्यात सहा जणांकडून शेतवस्तीतील घरावर दरोडा, एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास

| Updated on: Sep 14, 2020 | 7:19 PM

जालन्यात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा घालून एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला (Robbery in Jalana Farmer house).

जालन्यात सहा जणांकडून शेतवस्तीतील घरावर दरोडा, एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास
Follow us on

जालना : जालन्यात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा घालून तब्बल एक लाख 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला (Robbery in Jalana Farmer house). ही घटना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहिपुरी शिवारातील शेतवस्तीत मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दरोड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला (Robbery in Jalana Farmer house).

नवनीत बाबुराव लाघडे हे त्यांच्या परिवारासह शेतातील घरात झोपलेले होते. या दरम्यान सहा अज्ञात दरोडेखोरांनी लाघडेंच्या घरात दरोडा टाकला. यावेळी घरात लाघडे यांची आई, आत्या, पत्नी, मुलगा आणि भाऊही होते.

दरोडेखोरांनी लाघडे आणि त्यांचा भावाला काठीने मारहाण करुन त्यांच्या अंगावर रघ टाकून शांत बसवले. तर इतर चौघांनी घरातील नवनीत लाघडे यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांचे डोकं फोडले आणि आत्याला काठीने हातावर मारुन जखमी केले. लाघडे यांच्या पत्नीला लाथाबुक्कयाने मारहाण करुन घरातील सोन्याचांदीचे दागीने आणि नगदी सात हजार रुपये असे एकूण एक लाख 58 हजार 200 रुपयांचा माल दरोडेखोरांनी चोरुन नेला.

लाघडे यांच्या कुटुंबातील तीन जखमींवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. नवनीत लाघडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

सोन साखळीसाठी 20 वर्षीय तरुणाचा खून, मृतदेह खाडीत फेकला, तिघांना अटक

वयोवृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात, कोरोना चाचणीसाठी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर थरारक दृश्य