पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्यावर भरसभेत चप्पल फेकण्यात आली आहे. औरंगाबादमधील रॅलीचा हा व्हिडीओ देखील समोर आलाय. यात तेजस्वी यादव यांच्यावर अचानकपणे चप्पल फेकल्याचं स्पष्ट दिसत आहे. पहिल्यांदा चप्पल फेकण्यात आली तेव्हा ती तेजस्वी यादव यांच्या कानापासून गेली आणि दुसरी चप्पल थेट त्यांना लागली (Slippers thrown at Tejashwi Yadav during the rally of Bihar Election 2020).
तेजस्वी यादव औरंगाबादमधील रॅलीसाठी आले असताना ते मंचावर बसले. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर राजदचे अनेक नेतेही उपस्थित होते. यावेळी तेजस्वी यादव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना खाली बसून घेण्याचे विनंती केली. हे करत असतानाच मंचाच्या समोरील बाजूने तेजस्वी यांच्या दिशेने पहिली चप्पल आली. ही चप्पल तेजस्वी यांना न लागता जवळून गेली. तेजस्वी यांना हे लक्षातही आले नाही, मात्र तेजस्वी यांच्या शेजारील राजद नेत्याच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला. ते काही करतील त्याआधी दुसरी चप्पल थेट तेजस्वी यांना लागली.
#WATCH Bihar: A pair of slippers hurled at RJD leader Tejashwi Yadav at a public rally in Aurangabad, today. pic.twitter.com/7G5ZIH8Kku
— ANI (@ANI) October 20, 2020
विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी या घटनेला कोणताही राजकीय रंग देऊन वाद तयार न करता दुर्लक्ष केलं. या चप्पल हल्ल्यानंतरही तेजस्वी यांनी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे रॅलीला संबोधित केलं आणि पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांचा जोरदारपणे प्रचार करत रॅली आणि सभा घेत आहेत. बिहारमध्ये 3 टप्प्यात निवडणूक होत आहे. 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदानाने याला सुरुवात होईल. तसेच 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा :
बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट
‘फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड’, माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने काँग्रेसचा गंभीर आरोप
Slippers thrown at Tejashwi Yadav during the rally of Bihar Election 2020