स्मार्ट सिटी नाशिकमध्ये चक्क वाहतूक पोलिसांवर शहरातील खड्डे बुजवण्याची वेळ

| Updated on: Oct 06, 2019 | 4:32 PM

नाशिक शहरातील इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूकीचं नियोजन सुरळीत व्हावं यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी एक आदर्श (Nashik police Filing potholes) घालून दिला आहे.

स्मार्ट सिटी नाशिकमध्ये चक्क वाहतूक पोलिसांवर शहरातील खड्डे बुजवण्याची वेळ
Follow us on

नाशिक : वाहतूक पोलीस म्हटलं की सर्वच त्यांच्याकडे वाईट नजरेने (Nashik police Filing potholes) बघतात. कारण हे पोलीस वाहन चालकांकडून विनाकारण पैसे उकळतात असा सर्वांचाच आरोप असतो. सर्वच मंडळी सारखी नसतात त्यात काही अपवाद (Nashik police Filing potholes) असतात. मात्र नाशिक शहरातील इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूकीचं नियोजन सुरळीत व्हावं यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी एक आदर्श (Nashik police Filing potholes) घालून दिला आहे. नंदकिशोर गवळी आणि शरद पवार असे या दोन्ही पोलिसांची नाव आहे.

गवळी आणि पवार यांनी स्वत: हातात फावड आणि पाटी घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले. त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांचे सद्या शहरात जोरदार कौतुक होतं आहे. पण रस्त्यातील खड्डे बुजवण्याची ही वेळ वाहतूक पोलिसांवर का यावी हा ही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे.

स्मार्ट शहर म्हणून सतत दावा करणारी महापालिका या खड्यांकडे का लक्ष देत नाही. फक्त शहरात चार चांगली काम केली म्हणून स्मार्ट शहर झालं का.. नाही ना.. त्यामुळे आयुक्त, महापौर यांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणी आता शहरवासियांकडून होतं आहे.