पुणे : लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. 85 वर्षीय शांताबाई पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला. (Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar)
शांताबाई या वयातही अगदी सफाईने काठ्या फिरवत असल्याचे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हे खेळ सादर करत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओत सांगितलं.
आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असतानाचा व्हिडीओ शूट करुन कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. अल्पावधीतच तो अनेक नेटिझन्सपर्यंत पोहोचलाही.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
अभिनेता रितेश देशमुख याने या आजीचं कौतुक करत कोणीतरी मला यांच्याशी संपर्क करुन द्या, असे ट्वीट काल रात्री केले होते. त्यानंतर, मी या लढवय्या ‘आजी मा’शी बोललो, त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे, असे त्याने सांगितले.
Thank you so much -we have connected with this inspiring warrior Aaji Maa – incredible story. https://t.co/RuCfoZIi7M
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 23, 2020
पुणे पोलिस आयुक्तांनी ट्वीट करत आजीच्या कुटुंबाची आज सकाळी भेट घेणार असल्याचे सांगितले. पुण्यातील हडपसर भागात त्या राहतात, तर उंदरी भागात नेहमी आपली कला सादर करतात, अशी माहिती आहे.
Talent has no boundaries. @Venkatesham_IPS pic.twitter.com/qPHb6hnJY2
— CP Pune City (@CPPuneCity) July 23, 2020
हेही वाचा : Yashomati Thakur | सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली
(Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar)