पुणे : लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. शांताबाई पवार यांनी वयाच्या आठव्या वर्षी ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केली, 85 व्या वर्षीही त्यांचा जोश कायम आहे. शांताबाईंनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना आपला प्रवास उलगडला. (Social Media Star Warrior Pune Grandma Shantabai Pawar tells her inspirational journey)
वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.
उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजी सांगतात.
हेही वाचा : Shantabai Pawar | पुण्यातील आजीबाईंचा लाठ्याकाठ्यांचा खेळ, रितेशही म्हणाला ‘लय भारी’
शांताबाई पवार यांनी ढालपट्टा आणि बाटलीवर तोल सांभाळतानाचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. “काही वर्षांपूर्वी तारेवर चालताना पाय मोडला होता, तर बाटलीवर तोल सांभाळताना पडून हाताला दुखापत झालेली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली, हात अजूनही दुखतो, तरीही जिद्दीने हे खेळ अजूनही खेळते आणि पोटाची खळगी भरते” असे आजी म्हणाल्या. कठीण काळात मदतीचे अनेक हात पुढे आले. कधी सत्कार झाला, तर कधी आर्थिक हातभार मिळाला, असेही आजी आवर्जून सांगतात.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. शांताबाई पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला. शांताबाई या वयातही अगदी सफाईने काठ्या फिरवत असल्याचे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत.
Thank you so much -we have connected with this inspiring warrior Aaji Maa – incredible story. https://t.co/RuCfoZIi7M
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 23, 2020