सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची (Solapur Corona Cases Update) संख्या वाढत असताना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापुरात आज कोरोनाचे 29 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये बोरामणी येथील एका पोलीस कर्मचाऱ्यासह माळशिरस अकलूज येथील आई आणि मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचं आज समोर आलं. त्यामुळे आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने हातपाय पसरवले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची (Solapur Corona Cases Update) चिंता वाढू लागली आहे.
सोलापुरात आज कोरोनाचे नवे 29 रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 653 वर गेली आहे. तर आतापर्यंत 64 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 279 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यात एका 65 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांना तब्बल 800 वेळा डायलिसिस करण्यात आले आहे. तरीही रुग्णाच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि डॉक्टरांचे अथक प्रयत्नाचे हे यश म्हणावे लागेल. शहरातील पूर्व भागात आतापर्यंत 259 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 86 जण कोरोनातून मुक्त (Solapur Corona Cases Update) झाले आहेत.
Corona | अलिबागमध्ये एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्हhttps://t.co/WAIjwsJF7E#CoronaVirusUpdate #CoronaInMaharashtra #LockdownExtended #CoronaWarriors
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
सोलापुरात कुठे किती रुग्णांची कोरोनावर मात?
– सिव्हिल लाईन मधील 120 रुग्णांपैकी 61 जण बरे झाले आहेत
– कुमठा नाका परिसरातील 54 पैकी 25 जण बरे झाले आहेत
– नई जिंदगीतील 21 पैकी 11 जण बरे झाले आहेत
– आंबेडकर नगरमधील 8 पैकी 5 रुग्ण बरे झाले आहेत
– रेल्वे लाईनमधील 12 पैकी 3 रुग्ण बरे झाले आहेत
– सोलापूर ग्रामीणमधील 12 पैकी 6 जण बरे झाले आहेत
कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक आहे. सोलापुरातील कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. सोलापूरचा मृत्यूदर हा दहा टक्क्यापेक्षा वर गेला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्याचे मोठे आवाहन आता प्रशासना समोर आहे (Solapur Corona Cases Update).
संबंधित बातम्या :
मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित
पुण्यात कोरोना लक्षणांच्या दुर्लक्षाने शुक्रवारी एका तरुणाचा, तर सोमवारी एका महिलेचा मृत्यू
रायगडमध्ये आणखी 39 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर
सायन हॉस्पिटलची नर्स आणि तिच्या पतीविरोधात वर्ध्यात गुन्हा, प्रशासनाचा गंभीर आरोप