सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. दहावीच्या निकालानंतर बोर्डानं लगेचच अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीची (FYJC CET)घोषणा केली आहे. अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याचं काम सुरु आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं अकरावी प्रवेशाचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता 17 हजाराने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागानं अकरावी प्रवेशांचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्यात अकरावीची एकूण प्रवेश क्षमता 59 हजार 40 हजार एवढी होती. यंदा त्यात 17 हजाराने वाढ झाल्याने प्रवेश क्षमता आता 76 हजार 736 इतकी झाला आहे.
राज्य सरकरानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी निश्चित केली आहे. ही परीक्षा वैकल्पिक आहे. दहावीमध्ये पास झालेल्या सर्व मुलांना प्रवेश मिळणार मात्र नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 21 ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. बोर्डानं सीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत सीईटी परीक्षेची सविस्तर माहिती न पोहोचल्यानं परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन यावरुन विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.
सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.
इतर बातम्या:
अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरु; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?
Solapur Education Department decided to increase seventeen thousand seats for class FYJC