शेतात कामाला जा आणि कमवून आण, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलले

| Updated on: Jan 31, 2020 | 9:19 PM

शेतात कामाला जा आणि कमवून आण, असा तगादा लावत कामावर जात नसल्याने 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलून (Mother remove from home buldana) दिले.

शेतात कामाला जा आणि कमवून आण, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलले
Follow us on

बुलडाणा : शेतात कामाला जा आणि कमवून आण, असा तगादा लावत कामावर जात नसल्याने 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलून (Mother remove from home buldana) दिले. ही धक्कादायक घटना बुलडाणा येथे घडली. वयोवृद्ध आईला घरातून बाहेर काढल्याने वृद्ध आई खामगावच्या सामान्य रुग्णालयाचा सहारा घेत कसेबसे खाऊन (Mother remove from home buldana) जीवन जगत आहे. द्वारकाबाई पल्हाडे असं या वयोवृद्ध आईचं  नाव आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांचे मन हेलावले आहे. वृद्ध आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर आता पोलिसांकडून त्या वृद्ध आईला सुखरूप घरी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

द्वारकाबाई या 75 वर्षाच्या आहेत. त्या दोन मुलं, सून आणि नातवंडांसह पळशी येथे राहतात. मात्र काही दिवसांपासून द्वारकाबाई पल्हाडे यांना त्यांचा मुलगा सहदेव आणि वासुदेव पल्हाडे यांनी घरातून हाकलून दिले आहे. तर सुनांनी शिवीगाळ करत मारहाणही केली असल्याचा आरोप द्वारकाबाईंनी केला आहे. ही घटना घडल्यावर वृद्ध महिलेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठीत त्यांच्या दोन मुलांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

“द्वारकाबाईंची दोन मुलं सहदेव आणि वासुदेव आहेत. या दोघांनी तू कामावर जा आणि कमवून आणून दे, असा तगादा मुलांनी आईकडे लावला होता. मात्र द्वारकाबाईंचे वय झाल्याने त्यांच्याकडून काम होत नाही, असं सांगितल्याने मुलांनी मला घरातून हाकलून दिले”, असं पोलिसांनी सांगितले.

या वृद्ध महिलेकडे जवळपास 12 एकर शेती आहे. ही शेती त्यांची मुलं करतात. मात्र या वृद्ध आईला या वयात मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सामान्य रुग्णालयात आसरा घेऊन द्वारकाबाई जीवन जगत आहेत.

पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मुलाला फोन करुन आईला घेऊन जा असे सूचित केले होते. मात्र एक आठवडा झाला तरी वृद्ध आईला न्यायला कुणीही आले नसल्याने खामगाव शहरातील सामान्य रुग्णालयातील आवारात तिने आपले बस्तान मांडलं आहे. कडाक्याच्या थंडीत ही वृद्ध महिला उघड्यावर दिवस काढीत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलिसांकडून सध्या त्या वृद्ध महिलेला घरी मुलांकडे पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.