ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण अडकले आहेत. अशाचप्रकारे दिल्लीत युपीएससी (UPSC) स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेले 1600 मराठी विद्यार्थी अडकले होते. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे त्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे (Special train for UPSC students in Delhi). श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी दिल्ली ते भुसावळ या विशेष ट्रेनच्या प्रवासाला मान्यता दिली आहे. आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करुन विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे विशेष आभार मानले आहेत.
शनिवारी (16 मे) रोजी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ही विशेष ट्रेन धावणार आहे. ती गाडी रविवारी (17 मे रोजी) भुसावळ स्टेशन येथे पोहोचणार आहे. दरम्यानच्या प्रवासात ट्रेन महाराष्ट्राच्या हद्दीत आल्यानंतर विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी स्टेशनवर उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे, कल्याण आदी स्टेशनवर देखील ट्रेनला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याची अधिकृत माहिती मंगळवारपर्यंत (12 मे) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
Approx. 1200 UPSC examination aspirants belongs to Maharashtra State stranded in Delhi due to Lockdown, who wish to return to their hometown. In this regards,today I requested Hon.Shri. @PiyushGoyal ji to kindly arrange a special train for these students hailing from Maharashtra. pic.twitter.com/9ZmcsTO9vc
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) May 3, 2020
दरम्यान परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि दिल्लीतील वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढल्याने भयभीत झाले होते. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः या सर्व मुलांसोबत रविवारी (10 मे) झूम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत धीर दिला होता. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव अभय यावलकर, राज्य शासनाचे सचिव नितीन करीर, दिल्लीतील महाराष्ट्राचे सनदी एस सहाय्य यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेष रेल्वेच्या व्यवस्थेनंतर डॉ श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.
दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेच्या (#UPSC) तयारीकरिता गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी आज व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याबाबतीत मार्गदर्शन केले.@ShivSena @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @mieknathshinde pic.twitter.com/EzyhFHHezR
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) May 2, 2020
दरम्यान लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी आणि अमराठी विद्यार्थ्यांची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर भागातील वाजीराम क्लासेस समोर ही व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील ज्या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होत आहे त्यांनी अन्नपूर्णा किचन अंतर्गत लाभ घेण्यासाठी स्वयंसेवक मुक्तेश ( +918434244444 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने केलं आहे.
Special train for UPSC students in Delhi