रात्री अडीच वाजता एसटी पुरात अडकली, दैव बलवत्तर म्हणून 25 जण वाचले

| Updated on: Aug 07, 2019 | 5:24 PM

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्थानिकांनी रात्री अडीच वाजता पुरात अडकलेल्या (ST bus stucked in water) या बसला बाहेर काढलं आणि 25 प्रवाशांचा जीव वाचला.

रात्री अडीच वाजता एसटी पुरात अडकली, दैव बलवत्तर म्हणून 25 जण वाचले
Follow us on

रायगड : एसटी चालकाचं धाडस (ST bus stucked in water) रायगड जिल्ह्यात 25 प्रवाशांच्या जीवावर उठलं होतं. पण दैव बलवत्तर म्हणून या प्रवाशांचे जीव वाचले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्थानिकांनी रात्री अडीच वाजता पुरात अडकलेल्या (ST bus stucked in water) या बसला बाहेर काढलं आणि 25 प्रवाशांचा जीव वाचला. कमरेइतक्या पाण्यात अडकलेली ही बस पलटी होणारच होती. पण एका नाल्यात बस अडकली आणि ग्रामस्थ मदतीला धावून आले.

गेल्या दोन दिवसांपासून पुण्याकडील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे वरंध घाट, भोर घाट आणि डोंगर माथ्यावरुन सावित्री नदीच्या पाण्यात कमालीची वाढ झाली आहे. धोक्याच्या इशाऱ्यापेक्षा दीड मीटर पाणी जास्त आहे. त्यामुळे पोलादपूर, माणगाव आणि महाड या भागात पाणीच पाणी झालंय.

श्रीवर्धनकडे निघालेली एसटी महामंडळाची बस रस्त्यातच अडकली. चालकाने माणगाव – गोरेगाव मार्गे म्हसळा जाण्याचा मार्ग निवडला. गोरेगावमधून एसटी म्हसळ्याकडे निघाली. तेथे ग्रामस्थ डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. रात्री अडीच वाजताची वेळ होती. बांगी मोहल्ला उर्दू शाळेजवळ ग्रामस्थांनी बस थांबवली आणि चालकाला पाण्यातून जाऊ नये असा सल्ला दिला. मात्र श्रीवर्धन डेपोच्या या बस चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून पाच ते सहा फूट पाण्यात बस तशीच पुढे चालवली. काही अंतर पुढे जात नाही तोच प्रवाहात बस वाकडी होत बस कलंडत आली आणि सुदैवाने रस्त्यालगतच्या एक नाल्यात अडकली.

जीवाची पर्वा न करता धाडसी ग्रामस्थांनी कमरेइतक्या पाण्यातून ती बस कशीबशी ढकलत ढकलत कलडंलेल्या अवस्थेतून बाहेर काढली. गोरेगावमधील नदीम करदेकर, फहीम बुरुड, नदीम काझी, शाहबाझ लोखंडे, नवाब डावरे, अरबाज गोठेकर, मोहसीन पठाण, नाझी टोळ आणि गोरेगावच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसह बस चालकालाही बाहेर काढलं.

रात्री त्या ठिकाणी बस तशीच ठेऊन माहिती पोलीसांना देण्यात आली. सकाळी त्याच अवस्थेत ठिकाणी बसला पुन्हा ग्रामस्थांनी धक्का मारुन पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित रस्त्यावर आणलं. दीड तास चाललेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ग्रामस्थांनी 25 प्रवाशांसह बस चालकाचाही जीव वाचवला.