एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?’, निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल

| Updated on: Nov 02, 2020 | 10:52 PM

कोरोनासारख्या संकटामध्येसुद्धा हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तिथे ड्यूटी करत आहेत. | Nilesh Rane

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?, निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल
निलेश राणे
Follow us on

सिंधुदुर्ग: एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला? अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला संतप्त सवाल विचारला आहे. एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सरकारचा निषेध करतो असाही हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे. खरंतर, मुंबईमधे बेस्ट प्रवाशी वाहतुकीसाठी महाराष्ट्र भरातून गेलेल्या एसटी प्रवाशांना सरकारने सुविधा पुरवल्या नसल्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. (BJP leader Nilesh Rane take a dig on Mahavikas Aghadi govt)

माजी खासदार निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. या कर्मचाऱ्यांना ना चांगली रहाण्याची सोय केली ना जेवणाची. जेवणामध्ये अळ्या मिळत आहे. त्यांची जिथे व्यवस्था केली ते शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचं हॉटेल आहे. या खात्याचे मंत्री अनिल परब आहेत. कोरोनासारख्या संकटामध्येसुद्धा हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तिथे ड्यूटी करत आहेत. पण सरकार यांना काय देत आहे ? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या जेवणात किडे सापडतात. त्यांच्या राहण्याची सोय नाही. काल त्यांची मुले रस्त्यावर झोपली. ते कसेबसे आपला जीव वाचवून त्या क्वोरंटाईन सेंटरमधून आजही न्यायाची अपेक्षा करतायत. माञ सरकारला खरोखरच लाज वाटली पाहीजे असा घणाघात यावेळी निलेश राणे यांनी सरकारवर केला.

ते पुढे म्हणाले की, ‘सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे शभंर टक्के अपयशी आहेतच. हे आम्ही वेळोवेळी सांगतोय आता हे नवनवीन विषय बाहेर येतायत. खरोखरच महाराष्ट्राला न शोभणारी आणि अत्यंत दुखः देणारी ही घटना आहे. आमच्या मुलांना कर्मचाऱ्यांना रस्त्यावर झोपावं लागतं आहे. म्हणजे सरकारने त्यांना कामाला नेलं होतं की मरायला हा आमच्या समोर प्रश्न आहे आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करत’ असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

राणेंवर टीका करत केसरकर मोठे, शिवसेनेतही गांभीर्याने दखल नाही, वडिलांवरील टीकेला निलेश राणेंचे उत्तर

ठाकरे सरकार म्हणजे नुसते बोलबच्चन, मंत्रालयही दिल्लीत हलवा; निलेश राणेंची टीका

मानलं पवार साहेब, एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

(BJP leader Nilesh Rane take a dig on Mahavikas Aghadi govt)