पुणे : कोरोनाशी लढा देऊन ठणठणीत बरे झालेले राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करणार (Police Donate Plasma) आहेत. हा प्लाझ्मा इतर कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देणार आहे. पोलिसांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे (Police Donate Plasma).
आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या सहा जवानांनी प्लाझ्मा दान केला आहे. यापुढेही टप्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यासोबत पोलिसांनी इतर कोरोनामुक्त रुग्णांनाही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केलं आहे.
प्लाझ्मादानासाठी पहिल्या टप्प्यात 16 जवान पात्र ठरले आहेत. त्यातील सहा जणांनी ससून रुग्णालयात प्लाझ्मा दान केले आहे. पुणे विभागातील सुमारे 200 जवान कोरोनाबाधित झाले होते. त्यातील 85 जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी 65 जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले जाणार आहे.
जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठविले जाणार आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत मोठ्या संख्येने पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. अशापरिस्थितीत आता पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून कले जात आहे.
संबंधित बातम्या :
वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले, जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान
भाजप आमदाराचा प्लाझ्मादानाचा निर्धार, कोरोनामुक्त होताच घोषणा