नाशिक : बारामतीनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( chandrashekhar Bavankule ) यांनी नाशिककडे आपला मोर्चा वळविला आहे. भाजपच्या ( BJP ) प्रदेशाध्यक्ष पडी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच नाशिकला येणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बावनकुळे येणार असल्याने नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण या दोघांच्या वतीने जंगी स्वागत केले जाणार आहे. ठिकठिकाणी बाइकरॅलीचे ( Bike rally ) देखील आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय थेट प्रदेशाध्यक्ष येणार असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही पक्षप्रवेश आयोजित केलेले आहेत. त्यात सेनेचे काही नगरसेवक असल्याची माहिती समोर येते आहे. याशिवाय संजय राऊतांच्या जवळच्या काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण आणि हिंदुत्वावरुन ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. याशिवाय आगामी काळात येऊ घातलेली नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच आखणी केली जाणार असल्याचे सुतोवाचही बावनकुळे यांनी केले होते.
नाशिक दौऱ्यावरून जाताच बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच येणार असल्याने पदाधिकारी यांनी मोठी जय्यत तयारी केली आहे. भाजपा महानगर अध्यक्ष गिरीश पालवे आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे.
त्यांच्या स्वागतासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आली आहे. सकाळी ८.३० ते ०९.३० वा. बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा – सुभाष रोड – अनुराधा समोरुन – बिटको चौक – नाशिककडे – काठे गल्ली सिग्नल चौकातून – मुंबई नाका – कालिका मंदिर येथे समारोप होणार आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरया आणि ग्रामीण जिल्हा यांची बैठक होणार आहेत. यानंतर संघटनात्क बैठक दुपारी १२ ते ०२ वाजेपर्यत स्प्लेंडर हॉल, राजीव नगर ला होणार आहे.
तसेच कालिदास कला मंदिर येथे दुपारी २.३० ते ४.०० या कालावधीत सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. संध्या. ६.३० ते ७.१५ वा. पंचवटी कारंजा, नाशिक युवा वॉरियर्स शाखा उदघाटन बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या स्वागताच्या भव्य रॅलीसाठी नाशिक महानगर पदाधिकारी, आमदार, आघाडी आणि मंडलांचे पदाधिकारी जोरदार तयारी करत आहे.
एकूणच बावनकुळे यांचा नाशिक दौरा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना ऊर्जा देणारा असला तरी या काळात शिवसनेचे माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करण्याची तयारी देखील केली जात आहे. त्यात विशेष म्हणजे संजय राऊत यांच्या जवळच्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश करण्याच्या देखील हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.