मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाविरोधात (Team India Suresh Raina) मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या एअरपोर्ट नजीक असलेल्या ड्रॅगन फ्लाय या पबमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रैनासह अनेक लोकांना पोलिसांनी पकडले होते. रैनाविरोधात कलम 188 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या या पार्टीत गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), सुझान खानसह (Sussanne Khan) बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. (Mumbai Police files FIR against former Team India player for violating Corona rules)
Police book 34 people including cricketer Suresh Raina & some other celebrities under Section 188, 269, 34 of IPC & provisions of NMDA after a raid at Dragonfly pub for keeping establishment open beyond permissible time limit & not following COVID norms: Mumbai Police
— ANI (@ANI) December 22, 2020
रैनाच्या अटकेची बातमी माध्यमांनी दाखवताच सुरेश रैनाचे चाहते दुखावले गेले. अनेकांनी याप्रकणाची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. रैनाच्या चाहत्यांनी या घटनेप्रकरणी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने सुरेश रैनाला ट्विटवरुन सल्ला दिलाय की, “तू गुरु रंधावापासून लांब राहा, आम्हाला तुला आयपीएलमध्ये खेळताना पाहायचंय, जेलमध्ये नाही” काही चाहत्यांनी रैनाला कोणतीही चुकीची कामं करु नकोस, असाही सल्ला दिला आहे. (Stay away from Guru Randhawa, we want to see you in IPL, not in jail; Fans advise Suresh Raina)
??
Being a Rania fan in 2020
Heart ??#sureshraina pic.twitter.com/GBxgm3YZDX— S A I R A I N A ⚡ (@_Im_sai_) December 22, 2020
#SureshRaina
Sir guru randhawa se dur rho..hamko aapko ipl me dekhna h jail me nhi— Pranav Agrawal (@PokhuO) December 22, 2020
WE LOVE YOU
WE STAND BY YOU
WE KNOW YOU
Nothing else matters #RainaFamily✌
❤❤❤❤✊?✊?✊?✊? #Raina #SureshRaina pic.twitter.com/MQF4M6yo3r— Akansha(Raina Ki Deewani)❤?? (@akasureshraina) December 22, 2020
मुंबईतील एअरपोर्टनजीक ड्रॅगन फ्लाय पबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला पायदळी तुडवले. तसेच या पार्टीत उपस्थित असलेल्यांनी मास्कही लावला नव्हता. पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती मिळताच रात्री साडेतीनच्या दरम्यान त्यांनी या पबवर छापा टाकला. या पब पार्टीत गायक गुरु रंधावा, सुझान खान (Sussanne Khan) आणि इतर सेलेब्रिटीही उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैनासह या पब मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रैनावर आयपीसीच्या कलम 188, 269 आणि 34 नुसार कारवाई केली आहे.
संबंधित बातम्या :
Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा
(Stay away from Guru Randhawa, we want to see you in IPL, not in jail; Fans advise Suresh Raina)