मुंबईतला (Mumbai) रेड लाईट एरिया (red light area) म्हटलं की अनेकांना त्याबाबत कुतुहल असतं. कारण तिथं नेमकं काय घडत ? तिथं कुठली लोक असतात अशा अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. तिथली माहिती कधीतरी टिव्हीला पाहता, तर कधी एखाद्या वर्तमानपत्रात वाचलेली असते. नुकताच एक चित्रपट मुंबईतल्या रेड लाईट परिसरावरती येऊन गेला आणि पुन्हा मुंबईतले वेश्याव्यवसाय चर्चेत आले आहेतरे. भारतातील अनेक राज्यातील महिला तिथं रेड लाईट एरियात आहेत. तसेच प्रत्येक महिलेची कथा वेगळी आहे. मुंबईतला कामाठीपुरा (kamathipura) परिसर वेश्याव्यवसाय चालतो म्हणून अधिक प्रसिध्द आहे. तिथं राहत असलेल्या प्रत्येक महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एकदा त्या व्यवसायात उतरल्यानंतर तिथून बाहेर निघण सहज शक्य नसतं अस अशी माहिती प्रेरणा अॅण्टी ह्युमन ट्रॅफिकिंग या एनजीओनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कामाठीपुरात असलेली स्त्री तिची ओळख पाठ सोडत नाही
तिच्या वयाचा हिशेब कोणीही ठेवला नाही, पण तिला वाटते की तिचे वय 55 आहे. तिने जवळजवळ संपूर्ण आयुष्य कामाठीपुरामध्ये सेक्स वर्कर म्हणून व्यतीत केले आहे. ती तरुण असताना तिला अनेक वेश्यालयात देखील पाठवण्यात आले. तिने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नवीन मुलीशी कोणत्याही वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी असचं असतं. आता ती सेक्स वर्कच्या व्यवसायात नाही किंवा ती कामाठीपुरामध्ये राहत नाही. आता तिने एका एनजीओमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. आता त्यांची दोन्ही मुलं काम करत आहेत. ती स्वतः ठाण्यात भाड्याच्या घरात राहते. पण एवढे करूनही ‘कामाठीपुरात असलेली स्त्री’ ही ओळख तिची पाठ सोडत नाही अशी खंत तिने एका एनजीओकडे मांडली आहे.
दुसरी महिला मोहिनी सांगते की…
ती गेल्या 15 वर्षांपासून कामाठीपुरा येथे राहत आहे. ती एका वेश्यालयातून दुसऱ्या वेश्यालयात जात आहे. तिचं म्हणणं आहे की, तिचं आयुष्य इथं कधीच सोपं नव्हतं आणि इथे राहणाऱ्या इतर कोणत्याही महिलेचं आयुष्यही सोपं नव्हतं. त्यांना भूक, शारीरिक हिंसा, भावनिक आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. ती म्हणते- तुम्हाला वाटेल की मी कामाठीपुरात एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जात आहे, पण मला मोकळं कधीचं वाटलं नाही.
प्रेरणा एनजीओमुळे अनेकांचं आयुष्य बदललं
प्रेरणा नावाच्या या एनजीओमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. यामध्ये एका महिलेने सांगितले की, तिला दोन मुले आहेत. जे इयत्ता 6 आणि 9 मध्ये शिकतात. ते गेल्या चार वर्षांपासून प्रेरणाच्या नाईट केअर सेंटरमध्ये जात आहेत. प्रेरणा एनजीओ त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी आरोग्याशी संबंधित अनेक सत्रांचे आयोजन करते. तिथे आरोग्याच्या विकारांशी संबंधित अनेक गोष्टी शिकायला मिळतात.