दुचाकीला धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या

| Updated on: Jun 30, 2019 | 11:44 AM

दुचाकीला धडक बसल्याने जळगावमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना जळगावमधील एम. जे. कॉलेजच्या पार्किंमध्ये घडली. चार ते पाच तरुणांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दुचाकीला धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या
Follow us on

जळगाव : दुचाकीला धडक बसल्याने जळगावमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना जळगावमधील एम. जे. कॉलेजच्या पार्किंमध्ये घडली. चार ते पाच तरुणांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रोहित मधुकर सपकाळे (वय 23), असं मृत तरुणाचे नाव आहे.

मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (वय 23) हा एम जे कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी आला होता. यावेळी मुकेशला आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन त्याचा भाऊ रोहितही कॉलेजमध्ये पोहोचला. यावेळी रोहितच्या समोरील दुचाकीने अचानक ब्रेक लावल्याने या वाहनाला रोहितच्या दुचाकीची धडक बसली. यातून तीन ते चार जणांनी रोहितवर चॉपरने हल्ला केला. मुकेश हा आपल्या भावाला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून आला. परंतु, त्यालाही मारहाण झाली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला.

पोलीस अधीक्षकांनी कॉलेजमध्ये भेट देऊन पुढील तपासाची सूचना दिली आहे. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कॉलेज परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

“एम जे कॉलेज हे जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच विद्यार्थी या महाविद्यालयात आपला प्रवेश घेतात. या महाविद्यालयात सर्व प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोडकी आहे. मुलांच्या गटबाजीत अनेक मारामाऱ्या या महाविद्यालयात होत असतात. परंतु सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याने या महाविद्यालयात अशा घटना होत आहेत आणि महाविद्यालय प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची गंभीर दखल याबाबत घेतली जात नाही”, असं तेथील स्थानिक म्हणाले.

रोहितची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तापस पोलीस करत आहेत.