ISRO चं ऐतिहासिक यश, 10 उपग्रहांसह PSLV-C49 क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण

| Updated on: Nov 07, 2020 | 4:20 PM

इस्रोने (ISRO) पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात आपल्या यशाचा नवा टप्पा गाठला आहे. भारताच्या PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग केलं.

ISRO चं ऐतिहासिक यश, 10 उपग्रहांसह PSLV-C49 क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण
Follow us on

नवी दिल्ली : इस्रोने (ISRO) पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात आपल्या यशाचा नवा टप्पा गाठला आहे. भारताच्या PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग केलं. आधी हे लाँचिंग दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार होतं, मात्र नंतर यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी लाँचिंग झालं. या प्रक्षेपणाचं ‘काऊंड डाऊन’ शुक्रवारी (6 नोव्हेंबर) दुपारी रॉकेट लाँचिंगसाठी 26 तासांचं काऊंट डाऊन सुरु झालं होतं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून हे प्रक्षेपण झालं.

PSLVC49 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सुरुवातीला EOS01 हा उपग्रह चौथ्या टप्प्यात यशस्वीपणे क्षेपणास्त्रापासून वेगळा झाला आणि अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आला. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर 9 उपग्रह देखील यशस्वीपणे वेगळे होऊन आपआपल्या कक्षेत स्थिरावले. अशाप्रकारे या मोहिमेत इस्रोचा एक आणि अन्य 9 अशा एकूण 10 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं.

भारताची ही मोहिम अंतराळ क्षेत्रातील मोठं यश मानलं जात आहे. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार PSLV-C49 रॉकेटच्या सहाय्याने ‘EOS-01′(अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट) या उपग्रहासोबतच इतर 9 करारबद्ध उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करण्यात आलं. हे सर्व उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या एकत्रित करारानुसार प्रक्षेपित केले गेले.

‘EOS-01’अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाईटचं एक आधुनिक प्रकार आहे. याच्या सिंथेटिक अॅपर्चर (SAR)रडारमध्ये कुठल्याही वेळेत आणि कोणत्याही वातावरणात पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणातही पृथ्वीवर नजर ठेवू शकतो. या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. या उपग्रहाच्या सहाय्याने चीनसह सर्वच शत्रू राष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबत शेती, जंगल आणि पूरसदृश्य स्थितीवरही लक्ष ठेवता येणार आहे.

खासगी कंपन्याही अवकाशात सॅटेलाईट पाठवू शकणार

भविष्यात देशातील खासगी कंपन्यांनाही अवकाशात स्वत:चा उपग्रह (satellites) पाठवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या सॅटेलाईट लहरींच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांना परदेशातही सेवा पुरवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. अंतराळ विभागाने ( DoS) मोदी सरकारकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे देशांतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोदी सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यास खासगी कंपन्यांना केंद्राच्या नव्या अंतराळ धोरणानुसार अवकाशात सॅटेलाईट पाठवण्याची मुभा मिळेल. या कंपन्या सॅटेलाईटसच्या नियंत्रणासाठी परदेशात कंट्रोल रूम उभारू शकतात. तसेच या धोरणातंर्गत भारतीय कंपन्यांना स्वतंत्रपणे परदेशी सॅटेलाईटसची सेवाही घेता येईल.

संबंधित बातम्या :

शत्रू देशांवर नजर ठेवण्यासाठी इस्त्रोचा नवा उपग्रह, लवकरच अवकाशात झेपावणार

2020 मधील ISROची पहिली मोहीम, शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘EOS-01’उपग्रहाचं 7 नोव्हेंबरला प्रक्षेपण

चंद्रयान 2 मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एकाने जागा बदलली, NASA चे फोटो ट्विट करत तंत्रज्ञाचा दावा

Successful launching of 10 Satellites from PSLV C49 at Satish Dhavan Centre Shriharikota