Sukanya Samriddhi Yojana | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता दूर करा, सुकन्या योजनेत खातं उघडा

| Updated on: Dec 08, 2020 | 12:12 PM

ही योजना  विशेषकरुन त्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे, जे थोडी-थोडी बचत करुन आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात

Sukanya Samriddhi Yojana | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता दूर करा, सुकन्या योजनेत खातं उघडा
Follow us on

नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने नागरिकांच्या (Sukanya Samriddhi Yojana) भल्यासाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे सुकन्या योजना आहे. ही योजना  विशेषकरुन त्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे, जे थोडी-थोडी बचत करुन आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात (Sukanya Samriddhi Yojana).

या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शेअर बाजाराप्रमाणे खाते नाहीत, त्यामुळे आपले पैसे येथे सुरक्षित राहतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सूटही मिळते.

सुकन्या समृद्धि योजनेचं खातं कसं उघडाल?

घरी मुलीचा जन्म होताच ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत खातं उघडता येईल. कुठल्याही पोस्ट ऑफीसमध्ये किंवा कमर्शिअल ब्रांचच्या अधिकृत शाखेत खातं उघडता येतं. जर तुम्ही शेअर मार्केटच्या धोक्यापासून दूर राहू इच्छिता आणि फिक्स्ड डिपॉझिटमधील कमी व्याजापासून चिंतेत असाल तर तुम्ही येथे गुंतवणूक करु शकता.

हे खातं कधीपर्यंत ठेवू शकता?

सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची होतपर्यंत किंवा 18 वर्षांनंतर तिचं लग्न होईपर्यंत सुरु ठेवू शकता. यामध्ये खातं उघडल्याच्या दिवसापासून ते 15 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करु शकता (Sukanya Samriddhi Yojana).

खातं उघडण्याचे नियम

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे आई-वडील कायदेशीर पालक म्हणून मुलीच्या नावाने खातं उघडू शकतात. यामध्ये एका मुलीसाठी एकच खातं उघडता येतं. तर जास्तीत जास्त दोन मुलींसाठी तुम्ही खातं उघडू शकता. पोस्ट ऑफीस किंवा बँकेत खातं उघडते वेळी मुलीचा जन्माचा दाखला, त्यासोबत आई-वडिलांचा किंवा अधिकृत पालकांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्त्याचा पुरावा देणं गरजेचं असतं.

पैसे कधी मिळणार?

तुमची मुलगी 24 ते 30 वर्षांची होतपर्यंत सुकन्या समृद्धी योजना मॅच्यॉर होऊन जाते. त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजही मिळेत राहील. सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 18 वर्षांनंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. तर मॅच्यॉरीटीवर व्याजसह पूर्ण रक्कम मिळते. मुलीच्या लग्नावेळी हे पैसे खूप कामात येतात. त्यामुळे पालकांवर बोजा येत नाही.

Sukanya Samriddhi Yojana

संबंधित बातम्या :

मुलाच्या हव्यासापोटी सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून, निर्दयी मातेला बेड्या

मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत