इन्शाअल्लाह, जिताएंगे तो दादाकोही..! कुणाचं आवाहन; सुनेत्रा पवार यांचं ट्विट काय?

| Updated on: Oct 15, 2024 | 7:31 PM

अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सामाजिक उपक्रमात भाग घेत असतात. त्यांनी नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.

इन्शाअल्लाह, जिताएंगे तो दादाकोही..! कुणाचं आवाहन; सुनेत्रा पवार यांचं ट्विट काय?
Follow us on

राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करुन गेल्यावर्षी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना सोडचिट्टी दिली.आणि महायुती अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवार कुटुंबात प्रथमच विभागणी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघातून आपल्या चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले होते. त्यानंतर त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला होता. त्यांना सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. आता सुनेत्रा पवार राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला लागल्या आहेत.

राज्यातील महायुतीतील एक घटक पक्ष असला तरी अजित पवार यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. मित्रपक्ष भाजपा अल्पसंख्यांकावर टीका करीत असताना आपण मात्र पुरोगामी आहोत आणि मुस्लीमांच्या विरोधात नाही अशी प्रतिमा अजितदादांना ठरवून केलेली आहे. याचा एक भाग आपल्या मतदारांना बांधून ठेवण्यासाठी अजितदादा मुस्लीमांच्या बाजूने नेहमी भूमिका मांडत असतात. याचाच भाग म्हणून मुस्लीमांना देखील मराठा बांधवांसारखे आरक्षण मिळावे अशी मागणी ते लावून धरत असतात.

मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बारामतीतील व्यावसायिकांना मदत केली आहे.याच संदर्भात अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यानी एक्सवर पोस्ट टाकली आहे.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट –

सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी

इन्शाअल्लाह,
जिताएंगे तो दादाकोही..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बारामतीतील २५० छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी ३ लाख आणि २० महिला बचत गटांना प्रत्येकी २ लाख रुपये मंजुरीचे पत्र आज वितरीत केले.या योजनेतून मुस्लिम समाजातील २५० व्यावसायिकांना आणि २० बचत गटातील २०० भगिनींना एकूण ८ कोटी १० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.

अजितदादा यांनी सर्वच जाती धर्मा सोबत मुस्लिम समाजासाठी विविध विकास योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्तिगत पातळीवर झालेली मदत पाहून उपस्थित बंधू, भगिनी भारावून गेले होते. एक चूक झाली असे जाहीरपणे सांगून येत्या निवडणुकीत दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार सर्वांनी केला. ‘इन्शाअल्लाह, जिताएंगे तो दादाकोही’ असा एकमुखाने गजर केला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताकभाई अंतुले, सचिन सातव, अविनाश गोफणे, अल्ताफ सय्यद यांनीही आपल्या मनोगतात दादांच्या योगदानाविषयी, कार्यतत्परतेबद्दल भावना व्यक्त केल्या. प्रथमच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम भगिनींनी लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजनांबद्दलही दादांना धन्यवाद दिले.