पुणे: पुण्यातील ही महिला अवघ्या 3 मिनिटात रूचकर साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi Recipe) बनवते. अर्थात तिने आधीपासूनच याची तयारी केलेली असते. गरम कढईत तेल टाकल्यात हिरव्या मिरचीचा ठेचा असतो तसा बारीक ठेचा टाकलो जातो. यानंतर उकळलेल्या तेलात बटाटा टाकला जातो. यानंतर शेंगदाण्याचं कूट, त्यात थोडीशी कमी तिखट लाल चटणी. यानंतर त्यात चवीला मिठ आणि साखर टाकली जाते.
या साबुदाणा खिचडी बनवणाऱ्या महिलेचं नाव लक्ष्मी बोंगरे असं आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत, पण पुण्यातील माणिकबागजवळ या महिलेचा हा स्टॉल आहे. सकाळी सात ते दुपारी 12 पर्यंत हा स्टॉल असतो.
लक्ष्मी यांच्या पतीचं निधन झालं आहे, त्यांना 3 मुली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च लक्ष्मी या करतात. लक्ष्मी यांना महिला आणि बालकल्याण विभागाकडून खाद्यपदार्थांचे जे मेळावे आयोजित केले जातात, त्यात भाग घेण्याची इच्छा आहे. लक्ष्मी या अप्पे देखील सुंदर आणि चवदार बनवतात.
VIDEO :