ठाणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भुत आणि आत्मा याची भिती लोकांच्या मनातून जावी यासाठी एका अनोख्या सहलीचं आयोजन (picnic to meet ghost) केले होते. ‘चला भुताला भेटायला’ असे आवाहन करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सहल काढली. या सहलीत अनेकांनी सहभाग (picnic to meet ghost) घेतला होता.
मनातील भुताची भीती घालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेने स्मशान सहलीचे आयोजन केले जाते. ‘चला भुताला भेटायला’ असं या सहलीचं नाव होते. या सहलीत भूताची भेट घ्यायला ठाणेकर तरुणांसह लहान मुलं आणि महिलांनी एकच गर्दी केली होती. भुताची भीती का वाटते? भूत भेटल्याच्या, झपाटण्याच्या कथा कशा पसरतात, अशा अनेक शंकांचे निरसन यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या सहलीत करण्यात येते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा समन्वयक वंदना शिंदे या दरवर्षी पुढाकार घेऊन या ‘चला भूताला भेटायला’ सहलीचे आयोजन करतात. कुठेही भूत नसते, भुताचे भास होत असतात. काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी भूत लागल्याचा देखावा निर्माण केला जातो. तर कधी कधी मानसिक आजारामुळेही संतुलन बिघडते. तेव्हा भुताने झपाटले आहे, असे बोलले जाते. अशा वेळी बुवा-बाबांकडे न जाता वैद्यकीय उपचार केले जावेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यंदा ठाण्याच्या कोलशेत भागातील तरीचा पाडा स्नशानभूमीत या सहलीचे आयोजन केले होते.
या सहलीत तीन वर्षाच्या मुलांपासून ते 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्व लोक सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी यावेळेस भोंदू बाबांची हातचलाखी, ही हात चलाखी कशी ओळखायची आणि यापासून स्वत:चे आणि इतरांचे कसे सरंक्षण करायचे याचे प्रशिक्षणही यावेळेस वंदना शिंदेंनी दिले. ज्यामुळे खरच भूत असतो का याबाबत ठाणेकरांच्या शंकांचे निरसन झाले.