खासगी असो की सरकारी रुग्णालय, कोरोना चाचणी मोफत करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

| Updated on: Apr 08, 2020 | 9:59 PM

सरकारी आणि खासगी मान्यताप्राप्त सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी निशुल्क म्हणजेच मोफत करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे (Corona test free of cost in both Private and Government lab).

खासगी असो की सरकारी रुग्णालय, कोरोना चाचणी मोफत करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Follow us on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज (8 एप्रिल) कोरोना चाचणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारी रुग्णालय असो की खासगी मान्यताप्राप्त सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी निशुल्क म्हणजेच मोफत करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे (Corona test free of cost in both Private and Government lab). सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याची अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालयांना योग्य दिशानिर्देश देण्याचीही सुचना केली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या कोरोना निदान चाचणीतील मोठा अडसर दूर झाल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.


न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने कोरोना चाचणीवरील हा महत्वाचा आदेश दिला. हा आदेश देताना न्यायालयाने काही निर्देशही दिले आहेत. ते निर्देश खालीलप्रमाणे,

  1. कोरोना विषाणूच्या संसर्गासंबंधित चाचणी सरकारी प्रयोगशाळेत किंवा मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांमध्ये मोफत करण्यात यावी असं स्पष्ट करण्यात आलं. तसेच केंद्र सरकारने तात्काळ यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत.
  2. कोरोना संसर्गाची चाचणी एनएबीएल, जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोग शाळांमध्ये घेण्यात यावी.

दरम्यान, याआधी केंद्र सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी 4500 रुपयांचं शुल्क निश्चित केलं होतं. मात्र, शशांक देव सुधी यांनी या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीत म्हटलं, “प्राथमिक स्तरावर याचिकाकर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे देशावर इतकं मोठं संकट आलेलं असताना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही याचं निदान करण्यासाठी 4 हजार 500 रुपये आकरणे हे इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी हिताचं नाही. कोरोना चाचणीसाठी निश्चित करण्यात आलेले पैसे देता न आल्याने एकही माणूस या चाचणीपासून वंचित राहता कामा नये.”

यावेळी न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की, नंतर खासगी प्रयोगशाळा आपल्या शुल्काचा सरकारकडून परतावा देखील घेऊ शकतात. त्यावर नंतर निर्णय घेण्यात यावा. मात्र, आत्ता ही चाचणी मोफत असावी.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच

17 तज्ज्ञांचा सल्ला, केरळचा जबरदस्त लॉकडाऊन प्लॅन महाराष्ट्रही राबवणार?

घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांना बेड्या ठोकणार, मुंबई महापालिकेचं कडक पाऊल

Corona test free of cost in both Private and Government lab