मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. देशभरात शाळा-महाविद्यालय, बस, रेल्वे, मॉल्स, बाजार आणि मंदिरांसह चित्रपटगृह बंद करण्यात आली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार देशात काही ठिकाणी हळूहळू बस, रेल्वे, मंदिरं आणि चित्रपटगृह सुरु करण्यात आली. तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रुपेरी पडद्यावर चित्रपट झळकू लागले आहेत. (Suraj Pe Mangal Bhari Box Office Collection)
पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा ‘सूरज पे मंगल भारी’ (Suraj Pe Mangal Bhari) हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. रविवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार देशभरात 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. कोरोना महामारीचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असं म्हटलं जातंय की, कोरोना नसताना हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर चित्रपटाने जास्त कमाई केली असती.
काही चित्रपटगृहांमधील या चित्रपटाचे नाईट शो रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा मंदिर आणि Gaiety चित्रपटगृहातील नाईट शो रद्द करण्यात आला आहे. कमीत कमी 30 लोक चित्रपट पाहायला आले तरच चित्रपटाचा शो सुरु केला जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये जाणं टाळत आहेत. चित्रपटाचा शो आयोजित केलेला असूनही कमीत कमी 30 लोकही चित्रपट पाहायला आले नाहीत तर शो सुरु केला जात नाही, परिणामी अनेक ठिकाणी आयोजित शो रद्द करण्यात आले.
कोरोनाच्या परिस्थितीतही ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटाने 80 लाख रुपयांची कमाई केली आहे, ही आकडेवारी समाधानकारक म्हणावी लागेल. या चित्रपटात मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. तर सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, सीमा पाहवा, अन्नू कपूर आणि विजय राज या दिग्गजांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Diljit Dosanjh starrer ‘Suraj Pe Mangal Bhari’ comes like ray of sunshine in the industry that’s limping back to normalcy. Although first day footfalls are not great, public reports of Bollywood’s first new release after lockdown are very encouraging.https://t.co/nbgEV3b596 pic.twitter.com/6HlDTns8e3
— Komal Nahta (@KomalNahta) November 15, 2020
इतर बातम्या
‘कोलावेरी डी’नंतर धनुषच्या आणखी एका गाण्याचा यूट्युबवर धुमाकूळ, 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार
(Suraj Pe Mangal Bhari Box Office Collection)