मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (रविवार 21 जून) संपूर्ण भारतातून दिसले. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. 25 वर्षातून घडणारा हा दुर्मिळ खगोलीय अविष्कार पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमी, अभ्यासक आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळाली. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडली. (Solar Eclipse/Surya Grahan Information)
महाराष्ट्रात सकाळी 10 वाजताच्या सुमारास ग्रहण लागले. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटले. या काळात राज्यासह देशभरातील प्रमुख देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती. तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती सोवळ्यात ठेवल्या होत्या. देशभरात
[svt-event title=”पुण्यात १.३० वाजता ग्रहण सुटणार” date=”21/06/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse Live | पुण्यात १.३० वाजता ग्रहण सुटणार, नाशिक-नागपुरात १.५० वाजता ग्रहणमोक्ष https://t.co/6KF8gpVf4T pic.twitter.com/dpvbazIZsq
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”देशभरातील सूर्यग्रहणाची सहा दृश्ये” date=”21/06/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse Live | देशभरातील सूर्यग्रहणाची सहा दृश्ये https://t.co/D2qv4eGIHN pic.twitter.com/gzEsJRZr23
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”देशाच्या विविध भागातून टिपलेली सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये” date=”21/06/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse Live | देशाच्या विविध भागातून टिपलेली सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये लाईव्ह
YouTube Live : https://t.co/FGyDvzB7sw #SolarEclipse2020 pic.twitter.com/I5rfbgny4N— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”देहरादूनमधून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची दृश्ये” date=”21/06/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse Live : देहरादूनमधून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची दृश्ये https://t.co/6KF8gpVf4T pic.twitter.com/hyHqhhDWMs
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”राजस्थानमधून कंकणाकृती सूर्यग्रहण” date=”21/06/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ]
राजस्थानमधून कंकणाकृती सूर्यग्रहण https://t.co/6KF8gpVf4T pic.twitter.com/GqqpMjOcnf
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”पंजाबमधून दिसणारे सूर्यग्रहण” date=”21/06/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ]
Punjab: #SolarEclipse2020 as seen in the skies of Amritsar today. pic.twitter.com/usRHFtjlgP
— ANI (@ANI) June 21, 2020
[svt-event title=”सूर्यग्रहण काळात चंद्रभागा नदीत भाविकांचे स्नान” date=”21/06/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ]
सूर्यग्रहण काळात चंद्रभागा नदीत भाविकांचे स्नान https://t.co/6KF8gpVf4T pic.twitter.com/HWlreW0JhE
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो” date=”21/06/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ]
PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटोhttps://t.co/z74t0C3TU4 #SolarEclipse2020 #solareclipse
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”नाशिकमधून दिसणारे सूर्यग्रहणाचे दृश्य” date=”21/06/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ]
नाशिकमधून दिसणारे सूर्यग्रहणाचे दृश्य https://t.co/6KF8gpVf4T pic.twitter.com/xUA56BW5Pz
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”देशाच्या विविध भागातून टिपलेली सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये” date=”21/06/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse Live | देशाच्या विविध भागातून टिपलेली सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये लाईव्ह
YouTube Live : https://t.co/D2qv4eGIHN #SolarEclipse2020 pic.twitter.com/5gti6O17vv— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”सूर्यग्रहण कालावधीत तुळजाभवानीची पूजा” date=”21/06/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse | सूर्यग्रहण कालावधीत तुळजाभवानीची पूजा, पहा लाईव्ह
YouTube Live : https://t.co/FGyDvzB7sw #SolarEclipse2020 pic.twitter.com/OhpwVhKC77— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=”मुंबईत सूर्यग्रहण लागले” date=”21/06/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]
Solar Eclipse | मुंबईत सूर्यग्रहण लागले, पहा ग्रहणाची दृश्ये लाईव्ह
YouTube Live : https://t.co/D2qv4eGIHN #SolarEclipse2020 pic.twitter.com/58KIjYlMPS— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
[svt-event title=” २५ वर्षातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाचा योग, पहा ग्रहणाची वैशिष्ट्ये आणि दृश्ये लाईव्ह ” date=”21/06/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ]
संपूर्ण भारतातून दिसणारं सूर्यग्रहण हे अनेक कारणांनी खास मानलं जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. यानतंर उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. तर जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.
खग्रास सूर्यग्रहणादरम्यान जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच कंकणाकृती अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. महाभारताचे युद्ध झालेल्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरुन या सूर्यग्रहणाची स्थिती कंकणाकृती दिसणार आहे.
मुंबईतून रविवार सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे 70 टक्के झाकलेला दिसेल. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या पावसामुळे ढगाळलेलं वातावरण आहे. पण मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल, अशी शक्यता खगोलप्रेमींनी वर्तवली आहे.
शहर – साधारण वेळ
सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी फिल्टर चष्मे, फिल्म आणि दुर्बिणीचा वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.
यापूर्वी गेल्यावर्षी 26 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशिरा म्हणजे 3 नोव्हेंबर 2404 रोजी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. (Solar Eclipse/Surya Grahan Information)
Ring Of Fire Solar Eclipse | यंदाचं सूर्यग्रहण जगावरचं सर्वात मोठं संकट ठरलेल्या ‘कोरोना’ला निष्प्रभ करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरु https://t.co/gObL2vpcIn #SolarEclipse #SolarEclipse2020 #RingofFire
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2020
संबंधित बातम्या :
Chandra Grahan 2020 | वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?