मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे. त्यांची हत्या होऊ शकते, अशी अजब भीती सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंहने व्यक्त केली आहे (Sushant brother suspect Witnesses murder). तसेच मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देण्यास नकार देत आहे, असा दावा केला. आमदार नीरज सिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचाही दावा केला आहे.
भाजप नेते नीरज सिंह बबलू यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस साक्षीदारांना सुरक्षा देत नाही, असा दावा नीरज सिंह यांनी केला. तसेच साक्षीदारांच्या जीवाला धोका असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील या प्रकरणाची सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.
Witnesses are being threatened, and Mumbai Police is not even providing protection to them. The way things are unfolding, the witnesses might get killed. We demand that witnesses should be given police protection: Niraj Singh Babloo, BJP MLA & a relative of #SushantSinghRajput pic.twitter.com/UgBNqur8vG
— ANI (@ANI) August 18, 2020
‘मुंबई पोलीस पुरावे नष्ट करु शकतात’, सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदाराचा दावा
नीरज सिंह यांनी मुंबई पोलीस सुशांत सिंह प्रकरणातील पुरावे नष्ट करु शकतात अशीही भीती व्यक्त केली आहे. तसेच सीबीआयने तातडीने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली आहे.
सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने सर्वोच्च न्यायालयाला यावर लवकर निर्णय देण्याचं आवाहन केलं आहे. श्वेताने ट्वीट केलं, “सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करते. आम्ही खूप आशेने पाहत आहोत आणि खूप धीराने निर्णयाची वाट पाहत आहोत. या प्रकरणात होणाऱ्या प्रत्येक मिनिटाचा उशीर आम्हाला त्रास होत आहे.”
Requesting for an early decision from the Supreme Court, we have been very hopeful and have been patiently waiting. Every minute of delay is causing pain and heartbreak. #CBIForSSR
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 18, 2020
दरम्यान, सीबीआयने 13 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. तसेच सुशांच्या मृत्यू प्रकरणी आर्थिक बाजूने तपास करण्यासाठी ईडीलाही परवानगी द्यावी, असा आग्रह सीबीआयने केला होता. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना करु देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील सर्व घटना मुंबईत झाल्या असून मुंबई पोलीस योग्य तपास करत असल्याचं यात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
सुशांतचा भाऊ संजय राऊतांना भिडणार, मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा
Sushant Singh | रियाचे सीए ईडीच्या रडारवर, उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब तपासणार
घराचा हप्ता सुशांत भरत असल्याचा आरोप, अभिनेत्री अंकिता लोखंडेने घराची आणि बँकेची कागदपत्रे दाखवली
संबंधित व्हिडीओ :