मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या आत्महत्येची चौकशी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील मालवणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरच बंद केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. (Disha Salian Suicide Case Inquiry May Stop By Police)
सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट एसपी दिलीप यादव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे आत्महत्या प्रकरणाची चौकशी बंद केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. शिवाय, दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता. (Disha Salian Suicide Case Inquiry May Stop By Police)
संबंधित बातम्या :
Disha Salian | दिशाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!