मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस आज आणखी तिघांचे जबाब घेणार आहेत. सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर हिचा जबाब घेतला जाण्याची शक्यता आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Friend Rohini Iyer Inquiry)
रोहिणी ही सुशांतची जुनी मैत्रीण होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती सुशांतच्या संपर्कात होती. इतर व्यक्तींच्या जबाबात रोहिणीचा उल्लेख झाल्याने आता तिचाही जबाब नोंदवला जाणार आहे. रोहिणी आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यासाठी येणार आहे.
सुशांतचा आर्ट डायरेक्टर सिद्धांत पिठानीला तिसऱ्यांदा वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होता. विशेष म्हणजे तो शेवटपर्यंत सुशांतसोबत होता. त्यामुळे त्याच्याकडून पोलीस महत्त्वाची माहिती घेत होते.
हेही वाचा : Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल
मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहिण, वडील, घरातील नोकर यांचा समावेश आहे. सुशांतची कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटला बोलवले आहे.
यशराज फिल्म्सतर्फे सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या कराराचे कागदपत्र वांद्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. पोलीस या संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने तपास करत आहेत.
सुशांत दर दोन वर्षांनी मॅनेजरची टीम बदलायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून सुशांत दर 2 वर्षांनी आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मॅनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.
VIDEO : मी तुझ्या पोटी पुर्नजन्म घेईन, स्वप्नात येऊन सुशांतने सांगितलं : राखी सावंतhttps://t.co/pMlUXBEzsY
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
पोलिसांनी आतापर्यंत कोणा-कोणाचे जबाब नोंदवले
संबंधित बातम्या :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग
(Sushant Singh Rajput Suicide Case Friend Rohini Iyer Inquiry)