मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबालाही (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family) चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. सीबीआय त्यांची चौकशी करणार आहेत. रिया सह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांना लवकरच समन्स पाठवलं जाण्याची शक्यता आहे (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family).
आज सीबीआयचं एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे पोहोचलं. या ठिकाणी रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह दोन महिने थांबले होते. इथेच आध्यात्मिक रोग बरे करणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. त्याने 22 आणि 23 नोव्हेंबरला सुशांतची भेट घेतली होती.
सिद्धार्थ, निरज आणि सीए रजतची सीबाआयकडून चौकशी
आज डीआरडीओ कार्यालयात सकाळपासून सिद्धार्थ पिठाणी, कूक निरज आणि सीए रजत मेवाती या तिघांची सीबीआय चौकशी करत आहे. सिद्धार्थ पिठाणी आणि कूक निरज हे काल ही सीबीआय टीम सोबत होते. मात्र, आज त्यांच्यासोबत रजत मेवाती ही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिघांना आज समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे.
यापूर्वी सिद्धार्थ पिठाणी, निरज आणि दीपेश सावंत हे तिघे सीबीआय टीम सोबत होते. या तिघांनी मुंबई पोलिसांना जी माहिती किंवा स्टेटमेंट दिलं होतं आणि सीबीआयला जे स्टेटमेंट दिलं आहे त्यात तफावत असल्याची माहिती आहे .
म्हणूनच सीबीआय या तिघांकडून सत्य काय ते काढण्यात प्रयत्त करत आहेत. अजूनही डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये सिद्धार्थ पिठाणी, कूक नीरज आणि सीए रजत मेवाती या तिघांकडूंन सीबीआय अधिकारी तपास करत आहेत. मात्र, लवकरच सीबीआय टीम काही निष्कर्षावर पोहोचणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
LIVE UPDATE :
सीबीआयने रियाच्या चौकशीची पूर्ण तयारी केली आहे. रियासाठी सीबीआयने प्रश्नांची मोठी यादी तयार करुन ठेवली आहे (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family).
सीबीआय रियाला कोणते प्रश्न विचारु शकते?
– सुशांतची आणि तुझी भेट कशी झाली? तुमचं नातं पुढे कसं गेलं? तुम्ही दोघे लग्न करणार होते का?
– 8 जूनला असं काय झालं की तुला सुशांतचं घर सोडावं लागलं आणि त्याचा नंबरही ब्लॉक करावा लागला?
– सुशांत तणावाखाली असल्याची थ्योर काय आहे? सुशांतसोबत राहत अशताना तू त्याच्यासाठी काय केलं?
– सुशांतच्या कुटुंबासोबत तुझे संबंध कसे होते, त्यांनी तुझ्यावर जे आरोप लावले आहेत त्याबाबत काय सांगशील?
– सुशांतसोबत शेवटचं बोलणं काय झालं, काय तुला वाटतं की सुशांत आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकतो?
– सुशांतच्या कंपन्यांमध्ये तुझी भागीदारी काय होती आणि तुझा नेमकी भूमिका काय होती? कंपनीचे सर्व निर्णय तू घेत होती का?
– सुशांतचं घर, त्याचं बँक खातं आणि घरी काम करणाऱ्यां लोकांवर काय तुझा कंट्रोल होता?
– युरोप ट्रीपदरम्यान काय झालं? सिद्धार्थ आणि नीरजने सांगितलं की तिथून आल्यानंतर सुशांत तणावाखाली होता.
– सिनेमांपासून झालेली कमाई आणि त्यांच्या खर्चावरुनही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
– कॉल डिटेल्स समोर ठेवूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Sushant Singh Case | सुशांत आत्महत्याप्रकरणात सीबीआयकडून सीन रिक्रिएट, सिद्धार्थ पिठाणी, नीरज आणि दीपेशची तीन तास चौकशीhttps://t.co/dfGtZMlWtx#SushantSinghRajput #CBIEnquiryForSSR #CBIForSushantSinghRajput
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2020
CBI Investigate Rhea Chakraborty And His Family
संबंधित बातम्या :
सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर