मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत आहेत. तर दुसरीकडे सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी करणारे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिषेक त्रिमुखे आणि रिया चकवर्ती हे दोघे वारंवार फोनवर चर्चा करत असल्याचे तपासात उघड झाले होते. (Mumbai Police DCP Abhishek trimukhe Corona Positive)
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दाखल झालेली सीबीआयची टीम अभिषेक त्रिमुखे यांना वारंवार भेटली होती. याप्रकरणी सीबीआयच्या टीमने त्रिमुखे यांची कित्येकदा चौकशी केली. या तपासासाठी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना सीबीआय आणि मुंबई पोलिसांमधील नोडल ऑफिसर बनवण्यात आले होते. ते सातत्याने सीबीआयच्या संपर्कात होते.
अभिषेक त्रिमुखे यांच्यासह कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आता सीबीआयच्या टीमची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – CBI Inquiry | सुशांतला कोणता आजार होता? सुशांतला कोणते ड्रग्स द्यायची? सीबीआयकडून रियावर प्रश्नांचा भडीमार
दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर 21 जूनला अभिषेक त्रिमुखे यांनी रियासोबत 28 सेकंद फोनवर बातचीत केली होती. त्यानंतर 22 जूनला रियाच्या मॅसेजनंतर त्रिमुखे यांनी रियाला फोन केला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये 29 सेकंद चर्चा झाली होती. त्यानंतर 8 दिवसांनंतर त्रिमुखे यांनी स्वत: रियाला फोन केला. त्या दोघांमध्ये 66 सेकंद बातचीत झाली. यानंतर 18 जुलैला रियाने अभिषेक त्रिमुखे यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती.
या कॉल डिटेल्सद्वारे मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती ही डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या वारंवार संपर्कात होती. तसेच या दोघांमध्ये कित्येकदा SMS द्वारेही चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. (Mumbai Police DCP Abhishek trimukhe Corona Positive)
संबंधित बातम्या :
घराबाहेर गर्दीची तक्रार, सीबीआयच्या विनंतीनंतर रियासह कुटुंबाला मुंबई पोलिसांची सुरक्षा
CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?