श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर (Suspected Pigeon) सेक्टरमध्ये संशयित कबूतर सापडलं आहे. हे प्रकरण हिरानगरच्या मनियारी परिसरातील आहे. येथील ग्रामस्थांना हा संशयित कबूतर आढळून आला आहे. हे कबूतर सापडल्याने आसपासच्या परिसरात दहशत माजली आहे. या कबूतराचा वापर कुठल्या गुप्त कारवाईसाठी केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात (Suspected Pigeon) आली आहे.
भारत-पाकिस्तान (India-Pakistan Border) सीमेजवळील एका गावात संशयित कबूतर आढळून आलं आहे. शरीरावर लाल निशाणी असलेल्या या कबूतराच्या पायात एक रिंग फसलेली होती. या रिंगमध्ये काही नंबर लिहिलेले होते. या परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कबूतराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कबूतराच्या पायात असलेल्या रिंगबाबत तपासणी सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं (Suspected Pigeon).
Jammu&Kashmir: Locals in Kathua captured a pigeon near Indian border fences today. Shailendra Mishra, SSP Kathua says, “We don’t know from where it came. Locals captured it near our fences. We have found a ring in its foot on which some numbers are written.Investigation underway” pic.twitter.com/76RJilZTFO
— ANI (@ANI) May 25, 2020
पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून अशा प्रकारच्या घटना घडवून आणत आहे. पाकिस्तान या न्यूमेरिक कोडच्या माध्यमातून भारतात अशाच प्रकारच्या घटनांना वाव द्यायचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून या कबूतराला भारतीय सीमेत पाठवण्यात आलं असावं, असंही म्हटलं जात आहे.
पंजाबमध्येही दोन दिवसांपूर्वी कोड असलेला कबूतर सापडलं
ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सीमेजवळ पंजाबमध्ये असाच एक कबूतर आढळून आलं होतं. या कबूतरावरही न्यूमेरिक कोड होता, त्याशिवाय पाकिस्तानची मोहोर असल्याचाही दावा करण्यात (Suspected Pigeon) आला होता.
संबंधित बातम्या :
Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं
VIDEO : भारतीय जवानांचा पुन्हा धमाका, पाकिस्तानी चौक्या उडवल्या
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना
जगात काय घडतंय? : पाकिस्तानात 4 लाख माजी सैनिकांची पेन्शन चक्क भूतांनीच स्वीकारली