मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचे एम्सच्या विशेष पथकाने सीबीआयला दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. तर, या प्रकरणातील हत्येचा संशयही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. एम्सच्या अहवालानंतर हत्येची शक्यता वर्तवणारे सगळेच आता तोंडघशी पडले आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhasker) याप्रकरणावरून कंगना रनौतला (Kangana Ranaut) अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ‘कोणीतरी सरकारी पुरस्कार परत करणार होते’, असा खोचक सवाल स्वराने ट्विट करत विचारला आहे (Swara Bhasker Slams Kangana Ranaut over Sushant Singh Rajput Case).
एका मुलाखतीमध्ये कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केले होते. त्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येला तिने खून असल्याचे म्हटले होते. तसेच, माझे दावे खोटे ठरले तर, पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे वक्तव्य कंगनाने (Kangana Ranaut) केले होते. मात्र, आता एम्सच्या अहवालानंतर कंगनाने कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
याप्रकरणावरून स्वरा भास्करने (Swara Bhasker) ट्विट करत अप्रत्यक्षरित्या कंगना रनौतवर निशाणा साधला आहे. ‘आता सीबीआय आणि एम्स दोघेही एकाच निर्णयावर पोहोचले आहेत. सुशांत सिंह राजपूत याचे दुःखद निधन आत्महत्याच होती हे सिद्ध झाले आहे. ‘काही लोक सरकारने दिलेले पुरस्कार परत करण्याविषयी बोलले होते? कुठे आहेत ते आता?’, अशा आशयाचे ट्विट स्वराने केले आहे. (Swara Bhasker Slams Kangana Ranaut over Sushant Singh Rajput Case)
Hey! Now thay both CBI and AIIMS have concluded that #SushantSinghRajput tragically died by suicide… weren’t some people going to return their government bestowed awards??? ???
— Swara Bhasker (@ReallySwara) October 7, 2020
यानंतर सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar ट्रेंड सुरू झाला होता. यावर वैतागलेल्या कंगनाने ट्विट करत, एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. “ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही”, असे उत्तर देत कंगनाने (Kangana Ranaut) थेट ‘यु-टर्न’ घेतला आहे.
एम्सचा अहवाल सादर झाल्यांनतर सुशांतच्या वकिलांनी त्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. याविषयी बोलताना वकील विकास सिंह (Vikas Singh) म्हणाले की, एम्सच्या टीमने सुशांतच्या मृतदेहाची प्रत्यक्षात तपासणी केलेली नव्हती आणि त्यांचा अहवाल केवळ छायाचित्रांवर अवलंबून असल्याने, हा अहवाल निर्णायक मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या पथकाची नेमणूक करून या प्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘एम्सचा अहवाल निर्णायक नाही आणि तरीही सीबीआय आरोपपत्रात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून दाखल करू शकते’, असेदेखील ते म्हणाले.
(Swara Bhasker Slams Kangana Ranaut over Sushant Singh Rajput Case)
संबंधित बातम्या :