व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

| Updated on: Sep 13, 2020 | 4:18 PM

चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत (Tadoba National Park).

व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत (Tadoba National Park). ताडोबा प्रशासन कोर झोनमध्ये पर्यटन सुरु करण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र यासाठी सध्या काही अटी-शर्तींवर ताडोबा प्रशासनाचा विचार सुरु आहे. ताडोबा पर्यटनासाठी सुरु होणार असल्याने देशभरातील व्याघ्र प्रेमींसाठी ही खुशखबर आहे (Tadoba National Park).

ताडोबा पर्यटन कोरोनामुळे 18 मार्चपासून बंद आहे. ताडोबातील पर्यटन, स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न या निर्णयामुळे सुटण्याची शक्यता आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात करण्यासंदर्भात ताडोबा प्रशासन सकारात्मक विचार करत आहे. कोरोना साथरोग संकटाच्या सुरुवातीच्या काळात मार्च महिन्यापासून हा जगप्रसिद्ध व्याघ्रप्रकल्प संसर्गाच्या भीतीमुळे बंद करण्यात आला होता. मात्र यातील कोअर क्षेत्रात येत्या 1 ऑक्टोबरपासून पर्यटन खुले होण्याची शक्यता आहे.

ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 16 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेले ताडोबातील पर्यटन बफर क्षेत्रात आंशिकरित्या सुरू करण्यात आले होते. मात्र पावसाळ्याचा काळ लक्षात घेता बफर क्षेत्रातील या पर्यटनाला अल्प प्रतिसाद मिळाला. दरवर्षी 1 ऑक्टोबर ते पावसाळा लागेपर्यंतचा काळ ताडोबातील पर्यटनाचा हंगाम समजला जातो. हा हंगाम कॅश करण्याच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या पर्यटनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ताडोबाच्या गाभा क्षेत्रात सव्वाशे जिप्सी जाण्याची परवानगी असून सध्या सुमारे 100 जिप्सीला परवानगी देण्यात येणार आहे. जिप्सी चालक-मार्गदर्शक आणि पर्यटक या सर्वांना मास्क सॅनिटायझरसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना पाळाव्या लागणार आहेत. सहा प्रवेशद्वारांमधून हे पर्यटन सुरू होणार आहे. या निर्णयाने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

Tadoba National Park | ताडोबा व्याघ्र पर्यटनाला सुरुवात

तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण