पाक कलाकारांवरही कठोर पावलं उचला : विद्या बालन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाभरातून करण्यात येत आहे. यासोबतच बॉलिवूडमधूनही या हल्ल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे. अनेक बड्या कलाकारांनी पुलवामाचा निषेध करत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालननेही पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत कठोर करावाई करणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. आपल्या नवीन रेडीओ शोच्या […]

पाक कलाकारांवरही कठोर पावलं उचला : विद्या बालन
Follow us on

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाभरातून करण्यात येत आहे. यासोबतच बॉलिवूडमधूनही या हल्ल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे. अनेक बड्या कलाकारांनी पुलवामाचा निषेध करत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालननेही पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत कठोर करावाई करणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. आपल्या नवीन रेडीओ शोच्या लाँचिंग दरम्यान तीनं आपले मत व्यक्त केलं. लवकरच विद्या बालन ‘धुन बदल के तो देखो’ या रेडिओ शोच्या माध्यमातून चाहत्यांना भेटणार आहे.

“राजकारण हे कला क्षेत्रापेक्षा वेगळं ठेवलं पाहिजे. लोकांना एकत्र आणण्यासाठी कला हाच उत्तम मार्ग आहे. मग ते संगीत, शायरी, डान्स, थिएटर किंवा सिनेमा. पण मला आता असे वाटत आहे की, आता खुप झालं आणि यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे”, असं अभिनेत्री विद्या बालनने सांगितले.

विद्या बालनची ‘तुम्हारी सुलू’ 2017 मध्ये प्रदर्शित झाली होती. 2018 मध्ये विद्या बालनचा कोणता चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 2019 मध्ये विद्या बालनचा तेलगू चित्रपट ‘NTR’ प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला. बॉलिवूडमध्ये विद्याचा नवीन चित्रपट ‘मिशन मंगल’ येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती करत आहेत.