गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही

| Updated on: Sep 18, 2019 | 12:04 AM

Tata Motors ने 1994 मध्ये Tata Sumo ही एक आरामदायी आणि दमदार लूकची गाडी लाँच करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र 25 वर्षानंतर कंपनीने Sumo गाडी बंद (TATA sumo discontinue) केली आहे.

गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही
Follow us on

मुंबई : Tata Motors ने 1994 मध्ये Tata Sumo ही एक आरामदायी आणि दमदार लूकची गाडी लाँच करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र 25 वर्षानंतर कंपनीने Sumo गाडी बंद (TATA sumo discontinue) केली आहे. Tata Motors ने आपले प्रसिद्ध वाहन बंद केले आहे. मात्र अद्याप कंपनीनी (Tata Motors) याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान नुकतंच कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन ही गाडी हटवण्यात आली आहे. यासोबतच अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे ही गाडी (TATA sumo discontinue) बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे. या गाडीची किंमत 7 लाख 39 हजार ते 8 लाख 77 हजार रुपयांदरम्यान होती.

टाटा सूमो (TATA sumo discontinue) ही गाडी जुन्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्यामुळे नवीन सुरक्षा नियमानुसार यात मोठ्या प्रमाणात बदल करावे लागायचे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून या गाडीच्या विक्रीतही घट झाली होती. त्यामुळे सूमोला (TATA sumo discontinue) सुरक्षा नियमावलीनुसार बदल केल्यानंतर यात कंपनीला कोणताही फायदा मिळत नव्हता. यामुळे कंपनीमुळे या गाडीला बंद करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरला नव्हता.

तसेच 1 ऑक्टोबर 2019 पासून सर्व नवी गाड्यांमध्ये (TATA sumo discontinue) एअरबॅग, एबीएस, सीट-बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम आणि रिवर्स पार्किंग सेन्सर यासारखे काही गोष्टी सुरक्षेच्या कारणात्सव बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र जुन्या सूमोमध्ये या गोष्टींचा सहभाग नव्हता. त्यामुळे कंपनीने सूमो करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही.

सूमोचा शेवटचा मॉडल सूमो गोल्ड या नावाने ही गाडी (TATA sumo discontinue) उपलब्ध झाली होती. यात बीएस 4 एमिशन नॉर्म्सचा 3.0 लीटर, 4 सिलेंडर डीझेल इंजिन दिले होते. मात्र त्यानंतर टाटा मोटर्सने या इंजिनला बीएस6 एमिशन नॉर्म्सद्वारे अपडेट केले नव्हते. या सर्व कारणांमुळे टाटा कंपनीची सूमो गाडीने मार्केटला रामराम केल्याचे दिसत आहे.

टाटा कंपनीची सूमो एक प्रसिद्ध गाडी आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात कंपनी याच ब्रँडच्या नावे एक मॉर्डन एसयूवी बाजारात पुन्हा लाँच करु शकते.