पाटणा : राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जनतेने आम्हाला तुमच्या भ्रष्ट धोरणांवर आणि नियमबाह्य कामांवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश दिला आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले. आगामी काळात 19 लाख रोजगार, समान काम-समान वेतन या मुद्यांवर सरकारला घेरणार असल्याचा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला. (Tejashwi Yadav criticize Nitish Kumar on resignation of Mevalal Choudhari)
तेजस्वी यादव यांनी “मुख्यमंत्री नितीशकुमार जी आपण थकला आहात, असं मी म्हणालो होतो. तुमची विचार करण्याची शक्ती कमी झालीय, त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला मंत्री केले आणि राजीनामा घेण्याचं नाटक केले, असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला.
मा. मुख्यमंत्री जी,
जनादेश के माध्यम से बिहार ने हमें एक आदेश दिया है कि आपकी भ्रष्ट नीति, नीयत और नियम के खिलाफ आपको आगाह करते रहें। महज एक इस्तीफे से बात नहीं बनेगी। अभी तो 19 लाख नौकरी,संविदा और समान काम-समान वेतन जैसे अनेकों जन सरोकार के मुद्दों पर मिलेंगे। जय बिहार,जय हिन्द
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 19, 2020
नितीशकुमार आपण खरे गुन्हेगार आहात, मेवालाल चौधरी यांना आपण मंत्री का केले? तुमचा दुटप्पीपणा आणि नाटक चालू देणार नाही, असा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला.
तेजस्वी यादव यांनी माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी जदयू नेते मेवालाल चौधरी यांच्यावर केलेल्या आरोपांच्या बातम्या ट्विटरवर शेअर केल्या होत्या. नितीशकुमार यांनी हत्या आणि भ्रष्टाचाराचे आरोपी असणाऱ्या मेवालाल चौधरी यांना शिक्षणमंत्री केले आहे, बिहारच्या जनेतेने यातून काय बोध घ्यावा?, असा सवाल तेजस्वी यादवांनी केला.
दरम्यान, मेवालाल चौधरी यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी नितीशकुमार यांची भेट घेतली होती. राजीनामा दिल्यानंतर मेवालाल चौधरी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर 50 कोटींचा मानहाणीचा दावा करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मेवालाल चौधरी यांच्या मंत्रिपदावरुन विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मेवालाल यांना बोलवून घेतले होते. मेवालाल चौधरी तारापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. प्राध्यापक भरतीसंदर्भात त्यांच्यावर आरोप झाले होते.
राजद प्रमुख लालू प्रसाद यांनीदेखील यावरुन टीकास्त्र सोडले होते. भाजपवाले यापूर्वी मेवालाल यांना शोधत होते. ते सत्तेचा मेवा मिळाल्यानंतर गप्प आहेत, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.
काँग्रेसने नितीशकुमार यांनी मेवालाल चौधरी यांना शिक्षणमंत्री बनवून स्वत:ची प्रतिमा खराब केली, असा आरोप केला.
संबंधित बातम्या :
नितीश सरकारचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांप्रमाणे गृह विभाग स्वतःकडे, भाजपला कोणती खाती?
बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज’!; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी ‘धन्यवाद यात्रा’ काढणार
(Tejashwi Yadav criticize Nitish Kumar on resignation of Mevalal Choudhari)